गुजरात टाइटन्सला फाइनलसाठी मिळणार दोन संधी,

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK VS GT) मध्ये रविवारी 15व्या हंगामातला 62वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 विकेटसह विजय मिळवला.

Gujarat Titans will get two chances for the final
गुजरात टाइटन्सला फाइनलसाठी मिळणार दोन संधी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK VS GT) मध्ये रविवारी 15व्या हंगामातला 62वा सामना खेळला गेला.
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 विकेटसह विजय मिळवला.
  • गुजरातने 13 पैकी 10 सामने आपल्या नावे करत आधीच प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे.

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK VS GT) मध्ये रविवारी 15व्या हंगामातला 62वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 विकेटसह विजय मिळवला. गुजरातने 13 पैकी 10 सामने आपल्या नावे करत आधीच प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. कालच्या विजयासह टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी दोन संधी मिळतील. चेन्नई टीमच्या हातून 13 पैकी 9 सामने निसटले आहेत. आता मुंबईनंतर चेन्नईही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

स्वदेशी सोशल मीडिया मंच, 'कू' वर आयपीएलच्या या हंगामाबाबत बरीच चर्चा पहायला मिळते आहे. भारतीय क्रिकेटर्स आणि क्रिकेटचे चाहते टीम्सच्या जिंकण्या-हारण्यावर आनंद आणि दु:ख अशा दोन्ही भावना व्यक्त करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्स पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे. आणि लगोलग हा संघ  प्लेऑफमध्ये सहभागी होणार या बातमीने चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत.  

टीमच्या सदस्यांच्या उत्साहालाही विजयामुळे उधान आले आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामाचा कप आपण आपल्या नावे करू ही खात्री या टीमचे खेळाडू 'कू'वर व्यक्त करत आहेत.

गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीबाबत बोलायचे, तर तो 'कू'वर पोस्ट करताना म्हणतो:

अजून एकदा एकदम उत्कृष्ट खेळ, गुजरात बॉइज

टीममधला स्टार खेळाडू आणि या मॅचमध्ये आपलं नाणं सिद्ध करणाऱ्या वृद्धीमान साहाने 'कू' करताना म्हटले आहे:

ही गोष्ट आम्हाला खूपच आश्वस्त करते, की आम्ही टॉप 2 मध्ये ठसा उमटवला आहे. शेवटपर्यंत हाच वेग कायम ठेवण्यासाठी आम्ही अगदीच उत्सुक आहोत.

या सामन्यात गुजरात टायटन्सने 19.1 ओव्हरमध्ये विजय मिळवला.  गुजरातला सलामी जोडीने मजबूत सुरवात करून दिली.  वृद्धीमान  साहा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 59 धावा केल्या. यानंतर, गिल 18 धावा करून बाद झाला. 

साहाने केल्या नाबाद 67 धावा

वृद्धीमान साहाने मैथ्यू वेड आणि डेविड मिलरसह वेळोवेळी लहान-सहान भागीदारी करत संघाला 5 चेंडू उरलेले असताना विजय मिळवून दिला. साहा ने 57 बॉल आणि 8 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावा केल्या. मिलरने 20 बॉलमध्ये 15 धावांची खेळी केली. प्रतिस्पर्धी टीमकडून पथिराना ने 2 आणि मोईन अलीने 1 विकेट घेतली. 

लीग राउंडचे आता आहेत केवळ 7 सामने 

लीग राउंडचे आता केवळ 7 सामने शिल्लक आहेत. 10 टीम्स असल्यामुळे यावेळी एकुण 70 लीगचे सामने होणार आहेत. लीगचा शेवटचा सामना 22 मे रोजी खेळला जाईल. नॉकआउट राउंडचे सामने 24 मेपासून सुरू होतील. अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल. यावेळी आशा बोलून दाखवली जाते आहे, की टी20 लीगमध्ये नवा चॅम्पियन पहायला मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी