IPL 2022:सामना न खेळताच फायनलमध्ये पोहोचू शकते गुजरात टीम! जाणून घ्या प्लेऑफसाठी बीसीसीआयचा खास प्लान

IPL 2022
Updated May 24, 2022 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

GT vs RR: आयपीएल २०२२च्या प्लेऑफच्या सामना २४ मे पासून सुरू होणार आहेत. या सामन्यांआधी बीसीसीआयने प्लेऑफ सामने आणि फायनलबाबत नव्या नियमांची माहिती दिली आहे. 

gujrat titans
सामना न खेळताच फायनलमध्ये पोहोचू शकते गुजरात टीम!  
थोडं पण कामाचं
  • लीग स्टेजच्या पॉईंट टेबलमधील टॉप २मधील संघादरम्यान आयपीएल २०२२ दरम्यानचा पहिला क्वालिफायर सामना २४ मेला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे.
  • या सामन्याआधी बीसीसीआयने प्लेऑफच्या सामन्यात  आणि फायनलबाब नवी नियमांची माहिती दिली आहे
  • जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर कसा निकाल असू शकतो जाणून घेऊया.

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील लीग स्टेज संपला आहे. या हंगामातील ७० सामन्यानंतर निर्णय झाला की अखेर कोणते ४ संघादरम्यान प्लेऑफची लढाई बघायला मिळणार आहे. २४ मेला हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुजरात आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने प्लेऑफच्या सामन्यात  आणि फायनलबाब नवी नियमांची माहिती दिली आहे. जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर कसा निकाल असू शकतो जाणून घेऊया...gujrat titans can reach in ipl final without playing match, see how

अधिक वाचा - राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर

सामना न खेळताच होणार निर्णय

लीग स्टेजच्या पॉईंट टेबलमधील टॉप २मधील संघादरम्यान आयपीएल २०२२ दरम्यानचा पहिला क्वालिफायर सामना २४ मेला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२२च्या नव्या नियमांनुसार जर प्लेऑफच्या सामन्यात पावसामुळे अडथळा आला आणि सामना झाला नाही तर विजेत्याचा निर्णय कमीत कमी सुपर ओव्हर खेळून घेतला जाईल. मात्र सुपर ओव्हरचाही खेळ होऊ शकला नाही तर सामन्याचा निकाल पॉईट्स टेबलमधील टॉप संघाच्या बाजूने घेतला जाईल. 

गुजरात टायटन्सला मिळणार फायदा

लीग स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर गगुजरात टाइटंस (Gujarat Titans) आणि दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)हे संघ आहेत. बीसीसीआय्या नियमांनुसार जर यांच्यातील हा सामना खेळवला गेला नाही तर गुजरात टायटन्सला विजेता घोषित केले जाईल कारण गुजरात टायटन्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. हा नियम क्वालीफायर 1, एलिमिनेटर मॅच, क्वालीफायर 2 यांनाही लागू आहेत. 

क्वालिफायर १ सामन्यावर पावसाचे ढग

पहिल्या क्वालिफायर सामन्यात खराब हवामानाचा अडथळा ठरू शकतो. शनिवारी वादळामुळे इडन गार्डनवर धुमाकूळ घातला होता. वादळामुळे स्टेडियमचा प्रेस बॉक्सही तुटला आहे. आऊटफिल्ड पावसापासून वाचवण्यासाठी घालण्यात आलेले कव्हर्सही उढले होते. इतकंच नव्हे तर मंगळवारीही कोलकातामध्ये असेच हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक वाचा - घरातील मंदिरातून आजच हटवा या ५ गोष्टी, वाचा सविस्तर

फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे

प्लेऑफ बाबत आयपीएलच्या गाईडलाईननुसार २९ मेला होणाऱ्या फायनलसाठी एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. जर फायनलमध्ये टॉस नंतर खेळ झाला नाही तर रिझर्व्ह डेला पुन्हा टॉस होईल. मात्र सामन्यातील काही ओव्हर खेळले गेले तर सामना रिझर्व्ह डेवर जाईल आणि सामना त्याच ठिकाणाहून सुरू होईल जिथे थांबला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी