हरभजन सिंगची ४ कोटी रूपयांची फसवणूक, चेन्नईच्या उद्योगपतीविरोधात तक्रार दाखल

IPL 2020
Updated Sep 11, 2020 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Harbhajan Singh:हरभजन सिंगने उद्योगपतीविरोधा चेन्नई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हरभजनला ४ कोटी रूपयांना फसवले. 

harbhajan singh
हरभजन सिंगची ४ कोटी रूपयांची फसवणूक 

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगची फसवणूक
  • चेन्नईच्या उद्योगपतीने हरभजन सिंगला ४ कोटींना फसवले
  • हरभजन सिंगने चेन्नई पोलिसांमध्ये उद्योगपतीविरोधात तक्रार दाखल केली. 

मुंबई: टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटर हरभजन सिंगने(cricketer harbhajan singh) चेन्नई पोलिसांमध्ये(chennai police) एका उद्योगपतीविरोधात तक्रार(complaint) दाखल केली आहे. यात हरभजन सिंगला ४ कोटी रूपयांना फसवण्यात आले. हरभजन सिंगकडून पैसे घेणाऱ्या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अग्रीम जामीनाची याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. कारण याप्रकरणी हरभजन सिंगने तक्रार दाखल केली होती. 

हरभजन सिंगने सांगितले की त्याची जी महेश यांच्याशी भेट एका मित्राकरवी झाली होती आणि त्यांनी २०१५मध्ये कर्जाची रक्कम दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार महेश चेन्नईमध्ये उतांडी येथे जुहू बीच रोडवर राहतात. ४० वर्षीय ऑफ स्पिनरबाबत रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली की जेव्हा त्याने महेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्योगपतीने टाळाटाळ केली आणि कर्ज चुकते करण्यास टाळाटाळ केली. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार १८ ऑगस्टला महेशकडून आलेला २५ लाखांचा चेक बाऊन्स झाला. यानंतर हरभजन सिंगने चेन्नई पोलीस कमिशनरशी बातचीत केली आणि महेश आणि अन्य काही लोकांविरोधात तक्रार दाखल केली. याचिका नीलांकरायचे सहाय्यक पोलीस आयुक्ताकडे पाठवण्यात आली. त्यानंतर एसीपीनी महेश यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी आपले काऊंसेलर सुरेंदर आणि छेन्थुरी पुगाजेंधीच्या माध्यमातून अग्रीम जामीनासाठी अर्ज केला आहे. 

महेश यांनी आपल्या अर्जात असे म्हटले की त्यांनी सुरक्षा म्हणून थलम्बूरमध्ये एका संपत्तीच्या मोबदल्यात हरभजन सिंगकडून कर्ज घेतले होते. हरभजनकडेही आपल्या नावाची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. संपत्ती, कागदपत्र संख्या 3635/2015सोबत तिरूपुरूर उप-रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात आली होती. महेश यांनी असा उल्लेख केला आहे की त्यांनी हरभजनला सर्व उरलेली रक्कम दिली होती. 

आयपीएल २०२०मध्ये नाही खेळणार हरभजन

क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास या वर्षी हरभजन सिंगने आपले नाव आयपीएल २०२०मधून परत घेतले आहे. तो यावर्षी चेन्नई सुपरकिंग्सचे प्रतिननिधित्व करणार होता. काही तज्ञांच्या मते हरभजन सिंगला सीएसकेमध्ये पर्याय शोधणे कठीण आहे. हरभजन सिंग २००८ पासून आयपीएल खेळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी