हार्दिक पांड्याचा खुलासा, धोनीला आवडला माझा हेलिकॉप्टर शॉट

IPL 2019
Updated Apr 19, 2019 | 21:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची पद्धत महेंद्र सिंह धोनीला आवडली असल्याचं ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं सांगितलं आहे. सध्या आयपीएल २०१९ चा १२ सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये हार्दिकच्या हेलिकॉप्टर शॉटची खूप चर्चा आहे.

Hardik pandya
हार्दिक पांड्याचा खुलासा, धोनीला आवडला माझा हेलिकॉप्टर शॉट  |  फोटो सौजन्य: BCCL

Hardik pandya helicopter shot in Ipl 2019: हेलिकॉप्टर शॉट म्हणजे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची ओळख. त्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १२ व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटची चांगलीच चर्चा झाली. महेंद्र सिंह धोनीला ही हेलिकॉप्टर शॉट आवडल्याचं हार्दिक पांड्यानं सांगितलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक चांगली खेळी दाखवत आहे. ९ सामन्यांमध्ये हार्दिकनं १९४.६४ च्या स्ट्राईक रेटसोबत २१८ रन केल्या आहेत.  त्यानं गुरूवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान बॉलर कागिसो रबाडाविरोधात हेलिकॉप्टर शॉटचा वापर केला. 

२५ वर्षांच्या हार्दिकनं १५ बॉलमध्ये ३२ रनची खेळी केली. ज्यामुळे मुंबई इंडियन्सनं पाच विकेटवर १६८ रन केले आणि पुन्हा ४० रन करून विजय मिळवला. हार्दिकनं आपल्या खेळीत २ चौकार आणि षटकार ठोकले. त्यातला एक षटकार हेलिकॉप्टर शॉट होता. हेलिकॉप्टर शॉट हा धोनीनं लोकप्रिय केला आहे. हार्दिकनं चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध झालेल्या सामन्यात ही धोनी विरूद्ध हेलिकॉप्टर शॉट मारला होता. 

हार्दिकनं सांगितलं की, मला कधीच वाटलं नव्हतं की मी कधी हेलिकॉप्टर शॉट खेळेनं. मी नेटवर याचा अभ्यास करत होतो. मी धोनीच्या खोलीत गेलो आणि त्याला विचारलं की माझा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची पद्धत आवडली का ? त्यावर धोनी म्हणाला की हे चांगलं आहे. 

चांगली कामगिरी केल्यानं मॅन ऑफ द मॅच मिळालेल्या हार्दिकनं म्हटलं की, आपण बॉल चांगल्या पद्धतीन हिट करत आहोत. एवढंच काय तर मी स्वतः हून सांगतो की मला नाही वाटतं की मी कधी यापेक्षा चांगला बॉल मारला आहे. मी नेटवर खूप मेहनत घेत आहे आणि याचा मला फायदा देखील होत आहे. 

याआधीही ३ एप्रिलला झालेल्या मुंबई आणि चेन्नईच्या सामन्यात हार्दिक पांड्यानं धोनीच्या टीमविरोधात खेळताना हेलिकॉप्टर शॉट मारला. पांड्यानं हेलिकॉप्टर शॉट मारल्यानंतर आपल्या पद्धतीनं सेलिब्रेट केलं. यावर धोनी देखील त्याच्या शॉट आणि त्यानंतरच्या प्रतिक्रीया नोटीस करत होता. पांड्यानं ८ बॉलमध्ये नाबाद २४ रन बनवले होते. या खेळी दरम्यान पांड्यानं १ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यात हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीनं हार्दिकनं १ चौकार आणि १ षटकार ठोकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हार्दिक पांड्याचा खुलासा, धोनीला आवडला माझा हेलिकॉप्टर शॉट Description: हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची पद्धत महेंद्र सिंह धोनीला आवडली असल्याचं ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं सांगितलं आहे. सध्या आयपीएल २०१९ चा १२ सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये हार्दिकच्या हेलिकॉप्टर शॉटची खूप चर्चा आहे.
Loading...
Loading...
Loading...