Hardik Pandya Price: स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ अहमदाबादमध्ये सामील झाला आहे. फ्रँचायझीने हार्दिकला १५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हार्दिक यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. फ्रँचायझीने त्याला IPL-2022 च्या मेगा लिलावापूर्वी खरेदी केले. हार्दिकने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तो 6 वर्षे मुंबई संघाशी संबंधित होता.
हार्दिकने 7 वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. तो अनकॅप्ड खेळाडू होता. यानंतर 2018 मध्ये हार्दिकच्या फीमध्ये 110 पट वाढ झाली. त्यानंतर मुंबईने त्याला 11 कोटींमध्ये कायम ठेवले होते. आयपीएलमध्ये हार्दिकची किंमत वाढतच आहे. 2015 मध्ये 10 लाखांपासून आपला प्रवास सुरू करणारा हार्दिक आता आयपीएलमधून 15 कोटींची कमाई करीत आहे. म्हणजेच 7 वर्षांत त्यांचे मूल्य 150 पट वाढले आहे.
अधिक वाचा : किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल - नवाब मलिक
2014 मध्ये कोणीही खरेदी केले नाही
आयपीएलमध्ये हार्दिकची पहिल्यांदा 2014 मध्ये बोली लागली होती. तेव्हा त्यांना कोणीही विकत घेतले नाही. पुढच्या वर्षी हार्दिकचे नशीब खुलले आणि मुंबईने त्याला १० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.
पुढच्या लिलावापर्यंत हार्दिक हा कॅप्ड खेळाडू बनला होता. 2015 च्या मोसमात त्याने फक्त 9 सामने खेळले आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने सिलेक्टरर्सचे लक्ष वेधून घेतले. 2016 मध्ये त्याला ऑस्ट्रेलियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. हार्दिकची कामगिरी चांगली झाली आणि त्याचवेळी त्याची किंमतही वाढली.
अधिक वाचा : सारा अली खानसोबत घडला धक्कादायक प्रकार
IPL मध्ये हार्दिकची कशी आहे कामगिरी?
हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत एकूण 92 सामने खेळले असून त्यात त्याने 1476 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावर आयपीएलमध्ये चार अर्धशतके आहेत. या स्पर्धेत त्याने 98 षटकार आणि 97 चौकार मारले आहेत.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर पांड्याने आतापर्यंत 42 विकेट घेतल्या आहेत. पाठीच्या दुखण्यामुळे त्याने गेल्या मोसमात गोलंदाजी केली नव्हती.