GT vs SRH:नॉकआऊटमध्ये नशिबाने धोका देऊ नये, असं का म्हणाला पांड्या

IPL 2022
Updated Apr 28, 2022 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik Pandya on GT vs SRH Match:गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादला शेवटच्या बॉलवर मात दिली. या विजयासह गुजरातचा संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. 

hardik pandya
नॉकआऊटमध्ये नशिबाने धोका देऊ नये, असं का म्हणाला पांड्या 
थोडं पण कामाचं
  • इंडियन प्रीमियर लीग २०२२
  • गुजरात वि हैदराबाद सामना
  • गुजरातला मिळाला रोमहर्षक विजय

मुंबई: हार्दिक पांड्याच्या(Hardik pandya) नेतृत्वात गुजरात टायटन्सने(gujrat titans) आयपीएल २०२२(ipl 2022)मधील अनेक सामने जिंकले आहेत. जीटीने बुधवारी आणखी एका सनरायजर्स हैदराबादला(sunrisers hyderabad) ५ विकेटनी धूळ चारली. गुजरातला १९६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या बॉलवर सिक्स मारत त्यांनी हे ध्येय गाठले. हा विजयी षटकार रशीद खानने लगावला. जीटीला २० व्या ओव्हरमध्ये २२ धावा हव्या होत्या. त्यांनी २५ धावा करत विजय मिळवला. रशीदव्यतिरिक्त वृद्धिमन साहाने ३८ बॉलमध्ये ६८ आणि राहुल तेवतियाने २१ बॉलमध्ये नाबाद ४० धावा ठोकत शानदार फलंदाजी केली. 

अधिक वाचा - विशालला मिळाला कुसुमचा भन्नाट मेसेज

हार्दिक पांड्याने केले हे विधान

हैदराबादला हरवल्यानंतर जीटीचा कर्णधार हार्दिक पांड्याने मजेशीर अंदाजातत सांगितले की मी ड्रेसिंग रूममध्ये मजा मस्ती करत असतो की देव आम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही लोक चांगले आहात मी तुमची मदत करेन. शेवटच्या क्षणी विजय मिळाला हे अनेकदा घडले आहे.मात्र अशातच मला भीती आहे की नॉकआऊट सामन्यांमध्ये आमच्या नशिबाने आम्हाला धोका देऊ नये. दरम्यान, आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला आहे. हार्दिक खेळाडूंमधील बाँडिंगबाबत सांगितले की आमच्याकडे अतिशय चिल वातावरण असते. प्रत्येकजण पुढे येऊन जबाबदारी निभावत आहे. याचे जास्त श्रेय सपोर्ट स्टाफला जाते.

हार्दिकने का केली नाही गोलंदाजी?

हार्दिकने सामने गोलंदाजी केली यामुळे त्याचा फिटनेस चर्चेत आला आहे. जीटीचा कर्णधार म्हणाला माझी बॉलिंग करण्याच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतला गेला आहे. ही एक मोठी स्पर्धा आहे. जेव्हा संघाला माझी गरज असेल तेव्हा मी गोलंदाजी करणार मी लवकर उत्साहित होणार नाही. यावेळी पांड्याने अर्धशतकीय खेळीचे कौतुक केले. तो म्हणाला, साहाने गोलंदाजी केली. 

अधिक वाचा -महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा मुलाखत

गुजरातचा जबरदस्त विजय

गुजरात टायटन्सचे (जीटी) फलंदाज राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शेवटच्या षटकात जबरदस्त फलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी २२ धावा हव्या होत्या. रशीद खान आणि राहुल तेवतिया यांनी शेवटच्या षटकात ४ षटकार मारून गुजरात टायटन्सला (जीटी) विजय मिळवून दिला. राशिद खानने ११ बॉलमध्ये ३३ तर राहुल तेवतियाच्या बॅटने २१ बॉलमध्ये ४० धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी