Hardik Pandya Trolled: शमीवर राग काढणे हार्दिकला पडले भारी, सोशल मीडियावर ट्रोल

IPL 2022
Updated Apr 12, 2022 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik Pandya Trolled:गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आपल्या संघातील सहकाही खेळाडू मोहम्मद शमीवर राग काढण भारी पडले आहे. कारण सोशल मीडियावर चाहते त्यांला चांगलेच ट्रोलकरत आहेत. 

hardik pandya
Hardik Pandya: शमीवर राग काढणे हार्दिक पांड्याला पडले भारी 
थोडं पण कामाचं
  • शमीवर राग काढणे हार्दिकला पडले भारी
  • पांड्याने शमीवर रागावण्याचा केला प्रयत्न
  • सोशल मीडियावर ट्रोल झाला हार्दिक

मुंबई: सनरायजर्स हैदराबादविरुद्ध(SRH) सोमवारी सामन्यादरम्यान गुजरात टायटन्सचा(GT) कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आपला संघ सहकारी गोलंदाज मोहम्मद शमी(Mohammad Shami) वर रागावणे चांगलेच भारी पडले आहे. कारण सोशल मीडियावर चाहते त्याचा चांगलाच क्लास घेत आहेत. सोमवारी कर्णधार केन विल्यमसन्सने शानदार अर्धशतक ठोकत सनरायजर्स हैदराबादला गुजरात टायटन्सवर ८ विकेटनी विजय मिळवून दिला. 

शमीवरचा राग हार्दिकला पडला भारी

पहिल्यांदा गोलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला ७ बाद १६७ धावांवर रोखले. यानंतर सनरायजर् हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन्सने ४६ बॉलमध्ये दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५७ धावा करत आव्हानाचा पाठलाग केला. त्याला अभिषेक शर्मा आणि निकोलस पूरनची योग्य साथ मिळाली.

पांड्याचा शमीवर रागावण्याचा प्रयत्न

सनरायजर्स हैदराबादच्या डावाच्या १३व्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने शमीवर ओरडण्याचा प्रयत्न केला कारण याआधी केन विल्यमसन्सने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर पांड्याला बॅक टू बॅक सिक्स मारले होते. टायटन्सकडे ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्रिपाठीला बाद करण्याची संधी होती तेव्हा ३१ वर्षीय फलंदाजाचा अप्पर कट पूर्णपणे चुकला आणि डीप थर्ड मॅनच्या दिशेने गेला. डीप येथे शमी जर पुढे आला असता तर कॅच पकडू शकला असता. याऐवजी शमी काही पावले मागे गेला आणि एका टप्प्यावर बॉल पकडला. पहिल्या ओव्हरमध्ये विल्समसन्सने मारलेल्या सिक्सवर पांड्याने शमीवर आपला राग काढला. 

सोशल मीडियावर हार्दिक ट्रोल

एका चाहत्याने पांड्याला खराब कर्णधार सांगताना ट्वीट केले, प्रिय हार्दिक तु एक खराब कर्णधार आहेस. आपले सहकारी विशेषकरून शमी सारख्या वरिष्ठ व्यक्तीवर राग काढणे बंद कर. तर एका चाहत्याने लिहिले, हार्दिक पांड्याचे शमीवर ओरडणे खरंच लाजिरवाणे आहे. शमीने पांड्यासाठी जे केले ते कौतुक करण्यासारखे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी