IPL 2022: गुजरात चॅम्पियन बनताच भावूक झाली नताशा, रडला हार्दिक पांड्या

IPL 2022
Updated May 30, 2022 | 17:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

चमकदार जॅकेट्स आणि कानात हिऱ्याचे टॉप्स घालणारा हार्दित सुरूवातीला ग्लॅमरमध्ये बुडालेल्या तरूणासारखा दिसत होता मात्र एका बेपर्वाह तरूण ते जबाबदार कर्णधार बनण्याचा त्याचा हा प्रवास आहे. 

hardik pandya
गुजरात चॅम्पियन बनताच भावूक झाली नताशा, रडला हार्दिक पांड्या 
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्याच्या संघाने आयपीएलमध्ये विजय मिळवताच त्याची पत्नी नताशाने त्याला घट्ट मिठी मारली.
  • या मिठीद्वारे ती जणूकाही सांगत होती की वाईट काळात त्याच्यासोबत उभे राहणारे त्याचे कुटुंब चांगल्या दिवसांतही त्याच्यासोबत आहे.
  • गुजरात टायटन्सचा हा आयपीएलमधीच पहिलाच हंगाम आणि पहिल्याच हंगामात खिताब विजय. 

मुंबई: आयपीएलचा(ipl 2022) शेवटचा सामना संपताच हार्दिक पांड्या(hardik pandya) आयपीएलच्या ट्रॉफीकडे प्रेमाने न्याहाळताना दिसला. त्याचे हे रूप पाहून जणून एखादा बाप आपल्या मुलाला कौतुकाने न्याहाळत आहे. त्याच्या कठोर मेहनतीचे हे फळ होता. गुजरात टायटन्सचा(gujrat titans) हा आयपीएलमधीच पहिलाच हंगाम आणि पहिल्याच हंगामात खिताब विजय. Hardik pandya wife gets emotional after gujrat champion won title of ipl 2022

अधिक वाचा - 

मी प्रेमामुळेच जिंकलोय

हार्दिक पांड्याच्या संघाने आयपीएलमध्ये विजय मिळवताच त्याची पत्नी नताशाने त्याला घट्ट मिठी मारली. या मिठीद्वारे ती जणूकाही सांगत होती की वाईट काळात त्याच्यासोबत उभे राहणारे त्याचे कुटुंब चांगल्या दिवसांतही त्याच्यासोबत आहे. आपल्या जबरदस्त कामगिरीने फायनलमध्ये संघाला विजय मिळवून देणाऱ्या हार्दिकने यावेळी सांगितले, मी प्रेमामुळेच जिंकलो आहे. माझ्या कुटुंबाकडून मला भरभरून प्रेम मिळाले. 

नताशाबद्दल हे बोलला हार्दिक 

पत्नी नताशा, मुलगा अगस्त्य, भाऊ कृणाल आणि वैभव, पंखुडी वहिनी एखाद्या ढालप्रमाणे त्याच्यामागे उभ्या होत्या. हार्दिक म्हणाला, नताशा खूप भावूक झाली आहे. मला चांगलं करताना पाहून तीही खूप खुश आहे.तिने माझ्या करिअरमधील अनेक चढउतार पाहिले आहेत आणि तिला माहीत आहे की मी किती मेहनत केली आहे. 

तो पुढे म्हणाला, माझे कुटुंब माझी ताकद आहे. माझा भाऊ कृणाल, पंखुडी वहिनी, दुसरा भाऊ वैभव या सर्वांनी कठीण काळात माझी मदत केली आहे. मी फोन केला तेव्हा भाऊ आणि वहिनी रडायलाच लागले. हे आनंदाश्रू होते. मला माहीत आहे जोपर्यंत असे लोक माझ्या पाठिशी आहेत तोपर्यंत मी चांगला खेळ करू शकतो. 

अधिक वाचा- टीव्हीची संस्कारी बहू झाली टॉपलेस, अंगावर घातलेय फक्त गुलाब

महेंद्रसिंग धोनी प्रमाणे शांतचित्त ठेवत नेतृत्व करणाऱ्या हार्दिकला जेव्हा गुजरातचा कर्णधार बनवण्यात आले तेव्हा क्रिकेट पंडतिांनी या संघाला मैदानावर उतरण्याआधीच शर्यतीतून बाद ठरवले होते मात्र हार्दिकने हार मानली नव्हती आणि त्याने मोर्चा सांभाळताना ४८७ धावा बनवण्यासोबतच ८ विकेटही घेतल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी