रोहित शर्माच्या मुलीचा क्यूट व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

IPL 2021
Updated Mar 31, 2021 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात समायरा आपले वडील रोहित शर्माचे क्रिकेट हेल्मेट घालून आहे. यातच रितीका तिला सांगते की त ऋषभ चाचू(पंत)सारखी करत आहे. 

rohit sharma
Have yoo seen rohit sharma daughter cute video 

थोडं पण कामाचं

  • मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ बुधवारी शेअर करण्यात आला.
  • या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी तर समायराल मुंबई इंडियन्सची ब्रँड अॅम्बेसिडेर म्हटले आहे.

मुंबई : इंडियन प्रीमीयर लीगच्या पुढील हंगामासाठी जोरदार तयारी सुरू आहे. लीगच्या १४व्या हंगामातील पहिला सामना पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. यातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात भारताचा स्टार ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) ची मुलगी समायरा आपल्या आई-वडिलांसह मस्ती करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ती हेही सांगतेय की तिचे वडील सिक्स कसे मारतात आणि चौकार ठोकल्यानंतर अंपायर कसे हात हलवतात. 

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ बुधवारी शेअर करण्यात आला. यात समायला रोहित आणि रितिकासोबत दिसत आहे. तिने आपल्या वडिलांचे हेल्मेट घातले आहे. यातच रितीका तिला म्हणते की ती ऋषभ चाचू(पंत)सारखी दिसते. थोड्या वेळानंतर ती हेल्मेटकडे पाहून जोरात मुंबई इंडियन्स असे ओरडते. 

त्यानंतर रितीका विचारले ती तिचे वडील कसे सिक्स मारतात तेव्हा समायराल पुल शॉट मारते. थोड्या वेळाने ती हाताने चौकार ठोकल्याची अॅक्टिंग करते. जसे अंपायर मैदानात हात हलवतात. यावर रोहित आणि रितीका खूप हसतात. या व्हिडिओसोबत सोशल मीडियावर सॅमी(Sammy Trending) ट्रेंड करू लागले आहे. सॅमीला समायराचे छोटे नाव असल्याचे सांगण्यातआले. मुंबईने या नावासह हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी तर समायराल मुंबई इंडियन्सची ब्रँड अॅम्बेसिडेर म्हटले आहे. आयपीएलच्या १४व्या  हंगामातील पहिला सामना मुंबई आणि बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. ९ एप्रिलला हा सामना होत आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी