मुंबई: राजस्थान रॉयल्सचा(rajasthan royals) युवा ऑलराऊंडर रियान पराग(riyan parag) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा(royal challengers bangalore) हर्षल पटेल(harshal patel) यांच्यात आयपीएलच्या सामन्यात दरम्यान शाब्दिक वाद रंगला. जेव्हा रियान परागने पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १८ धावा केल्या तेव्हा त्यांच्यात हा वाद झाला. रियान परागने शानदार फलंदाजी केली आणि ३१ बॉलमध्ये ५६ धावांची खेळी केली. त्याने डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलविरुद्ध एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यानंतर राजस्थानने हा सामना २९ धावांनी गमावला. Heated argument between riyan parag and harshal patel during ipl match
अधिक वाचा - केंद्रीय विद्यालयातली कोट सिस्टिम बंद
शेवटच्या ओव्हरमध्ये जा रियान परागने मिडविकेट बाऊंड्रीवर पटेलला चौकार ठोकला तेव्हा दोन्ही खेळाडूंदरम्यान वाद झाला. यानंतर रॉयल्सच्या एका खेळाडूला मध्यस्थी करावी लागली. यानंतर जेव्हा डाव संपला तेव्हा दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये परतत होते यावेळीही दोन्ही खेळाडूंदरम्यान बाचाबाची झाली. पटेलने चार ओव्हरमध्ये ३३ धावा देत १ विकेट मिळवली.
Harshal patel and riyan parag fight from stadium#riyanparag #harshalpatel #ipl #RRVSRCB #rcbvsrr #pune pic.twitter.com/2ICjMqO84O
— Jayesh #Rinku Stan acc (@Jayesh_2009) April 26, 2022
हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत होते तेव्हा परंपरेनुसार एकमेकांना हात मिळवले जातात मात्र जेव्हा रियान पराग हर्षल पटेलला हात मिळवण्यासाठी पुढे आला तर हर्षल पटेलने राजस्थानच्या या युवा खेळाडूकडे लक्ष न देता आपला राग व्यक्त केला. जाहीरपणे क्रिकेट जगत हर्षल पटेलच्या या कृतीने नक्कीच खुश असणार नाही.
Wrong or right but brother always your side 🔥🔥#HarshalPatel#RCBvsRR #Siraj #RCB #riyanparag #IPL20222 pic.twitter.com/5GMokZe7no
— अभिषेक पुंडीर (@_abhishekpundir) April 27, 2022
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रियान परागच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या ोरावर आपल्या संघाची लाज वाचवली. राजस्थानने २० ओव्हरमध्ये ८ बाद १४४ धावा केल्या.
अधिक वाचा - वजन कमी करण्याविषयीचे ६ गैरसमज आणि प्रत्यक्षातील स्थिती
प्रत्युत्तर देण्यााठी उतरलेल्या बंगळुरू संघाचे स्टार खेळाडू पार डळमळले आणि पॅव्हेलियनला परतले. विशेष म्हणजे त्यांचे सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाही. डू प्लेसिसने सर्वाधिक २३ धावांची खेळी केली.