आमचा Hitman लय पावरफुल ; म्हणून लागला पचास तोला entertainment

IPL 2023
भरत जाधव
Updated Apr 14, 2023 | 21:52 IST

Rohit Sharma in Sanjay Dutt Look: मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक व्हिडीओच्यात्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने पचास तोला entertainment असं कमेंट केलं आहे.

Hitman is powerful; Rohit get up like sanjay dutt
आमचा Hitman दिसतोय नेता म्हणतोय पचास तोला   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्धात होणार आहे.
  • रोहित शर्माने त्याच्या इंस्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
  • व्हिडिओमध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेह, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल देखील दिसत आहेत.

Rohit Sharma in Sanjay Dutt Look: मुंबई: मुंबई इंडियन्स संघाने (Mumbai Indians team)दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा (Delhi Capitals)पहिला सामना (match) जिंकला. मुंबई (Mumbai)आणि दिल्लीमधील (Delhi) हा सामना रोमांचक झाला कारण हा सामनाही शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला होता. आता मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विरुद्धात होणार आहे. हा सामना देखील रंगतदार आणि रोमांचक होऊ शकतो. केकेआरविरुद्ध खेळण्यापूर्वी एमआयचा कर्णधार रोहित शर्मा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  यात तो नव्या लूकमध्ये दिसत आहे.  (Hitman is powerful; rohit get up like sanjay dutt, says pachas tola entertainment)

अधिक वाचा  : Daily Horoscope : आज शनिदेव या तीन राशींना करणार मालामाल
रोहित शर्माने त्याच्या इंस्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्याकडे पाहून रोहित शर्मा हा नेता वाटत आहे, परंतु त्याने वास्तव चित्रपटातील संजय दत्त सारखं सोनं परिधान केलं आहे. त्या व्हिडिओवर त्याने पचास तोला entertainment असं कमेंट केलं आहे.

 रोहितने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला जो जाहिरातीचा शूटचा आहे. या व्हिडिओमध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेह, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल देखील दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कोलकाताविरुद्ध खेळण्यापूर्वी भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलसोबत जाहिरात करत आहे.  यात रोहित शर्मा बॉलिवूड स्टार संजय दत्तच्या वास्तव लूकमध्ये दिसणार आहे.

अधिक वाचा  : या टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकंती

 रोहितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि निळ्या रंगाचा वासकोट घातला आहे.  संजय दत्तप्रमाणेच त्याने गळ्यात पन्नास तोळ्याची सोन्याची चैन आणि हातात सोन्याचं ब्रेसलेट घातलं आहे.  या जाहिरातीदरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने खऱ्याखुऱ्या रघूचा लूक चांगलाच साकारला आहे. रोहित शर्मा आणि संजय दत्तच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. खऱ्या रघूच्या या लूकमध्ये रोहित खूपच छान दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी