MI vs RCB: ३२ बॉलवर १९२ धावा ठोकणाऱ्या पोलार्डला कसा रोखणार विराट कोहली?

IPL 2021
Updated Apr 08, 2021 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

RCB विरुद्ध किरेन पोलार्डचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याचा स्ट्राईक रेट १७०च्या जवळपास आहे. ओपनिंग मॅचसाठी पोलार्ड नेट्सवरही खूप सराव करत आहे. 

kiren pollard
३२ बॉलवर १९२ धावा ठोकणाऱ्या पोलार्डला कसा रोखणार विराट? 

थोडं पण कामाचं

  • अवघ्या काही तासांतच आयपीएलचे बिगुल वाजत आहे
  • मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना रंगत आहे.
  • मुंबईच्या चाहत्यांमध्ये पोलार्ड आणि मुंबईच्या संघाबाबत उत्सुकता आहे.

मुंबई: IPL 2021चा काऊंटडाऊन संपायला आला आहे. म्हणजेच अवघ्या काही तासांतच आयपीएलचे बिगुल वाजत आहे. मुंबई इंडियन्स(mumbai indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) यांच्यात पहिला सामना रंगत आहे. या सामन्यात मुंबईचा असा एक खेळाडू आहे जो विराट कोहली आणि त्याच्या संघासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याचे नाव आहे किरेन पोलार्ड. हे आम्ही सांगत नाही आहोत तर याच्या मागे ठोस कारण आहे.

याआधी मुंबई इंडियन्सने शेअर केलेला व्हिडिओ पाहा. यात किरेन पोलार्ड ओपनिंग सामन्याच्या एक दिवसआधी क्वारंटाईन संपवून नेटवर अभ्यास करत आहे. पोलार्डने आपल्या नेट प्रॅक्टिसची सुरूवात पहिल्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार ठोकला. यानंतर काही बॉलला तो डिफेन्स करताना दिसला. ज्यामुळे सामन्यात कठीण परिस्थिती आली तर तो त्याच्या मुकाबला करू शकतो. याशिवाय त्याने काही आणखी सिक्स मारले. 

पोलार्ड म्हणाला, मी येथे आहे

मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीच्या पोलार्डने हा व्हिडिओ शेअर करण्याआधी काही तास हे म्हटले. जेव्हा मुंबईची पलटण या फ्रेंचायजीला सातत्याने विचारत होते की पोलार्ड कुठे आहे? कारण पोलार्ड सराव करताना दिसत नव्हता. मात्र पोलार्ड स्वत: समोर आला आणि म्हणाला, मी येथे आहे.

आरसीबीचे टेन्शन वाढवणार किरेन पोलार्ड

मुंबईच्या चाहत्यांमध्ये पोलार्ड आणि मुंबईच्या संघाबाबत उत्सुकता आहे. ओपनिंग सामन्याआधी आरसीबीचे टेन्शन वाढले आहे. याचे कारण आहे किरेन पोलार्ड. पोलार्डचा आरसीबीविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्यानने ३२ सिक्स मारले यातून त्याने १९२ धावा केल्या. त्याचा विराटच्या टीमविरुद्धचा स्ट्राईक रेट १७० आहे. किरेन पोलार्डने आरसीबीविरुद्ध ५५६ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १६६.५६, ३२ षटकार आणि ३९ चौकार. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी