IPL 2022: हैदराबादचा दुसरा विजय, गुजरातचा का झाला पहिला पराभव कर्णधार पांड्यानं सांगितली कारणे

IPL 2022
भरत जाधव
Updated Apr 12, 2022 | 07:53 IST

आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामातील 21 व्या सामन्यात अखेर गुजरातच्या (Gujarat) विजयी घोडदौडीला हैदराबादनं (Hyderabad) लगाम लावली आहे. आतापर्यंत सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातचा हैदराबादने आठ गडी राखून पराभव केला.

Gujarat's first defeat, the reasons given by Captain Pandya
IPL 2022: सामना गमवल्यानंतर हार्दिक खेळाडूंवर नाराज   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातचा हैदराबादने आठ गडी राखून पराभव केला.
  • चार गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहचला.
  • गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने 5 चेंडू आणि 8 गडी राखून पार केलं.

IPL 2022, SRH vs GT: मुंबई :  आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामातील 21 व्या सामन्यात अखेर गुजरातच्या (Gujarat) विजयी घोडदौडीला हैदराबादनं (Hyderabad) लगाम लावली आहे. आतापर्यंत सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातचा हैदराबादने आठ गडी राखून पराभव केला. केन विल्यमसनची (Ken Williamson) कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी (Batting)आणि निरोलस पूरन, मार्करमचा फिनिशिंग टचच्या बळावर हैदराबादने आपला दुसरा विजय मिळवला आहे. गुजरात पहिल्यांदा का पराभूत झाली असून गुजरात टायटन्सचे कर्णधार हार्दिक पांड्यांनी त्याची कारणे सांगितली आहेत. 

दरम्यान, या विजयासह हैदराबाद संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला. चार गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने 5 चेंडू आणि 8 गडी राखून सहज पार केले. केन विल्यमसन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना संयमी अर्धशतक झळकावले. 

गुजरात का पराभूत झाले, हार्दिक म्हणतो ... 

सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, 'फलंदाजी करताना आम्ही 7 ते 10 धावा कमी केल्या, या धावा शेवटी खूप महत्त्वाच्या असतात. गोलंदाजीतील दोन खराब षटकांनी आमचा खेळ खराब केला., मात्र अखेरच्या षटकांमध्ये संघाने विकेट गमावल्याने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. याच कारणामुळे कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीवर नाराज होता.

हैदराबादच्या गोलंदाजांचे कौतुक केले

सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, 'माझ्या मते त्यांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टीवर असामान्य उसळी होती आणि त्यांचे गोलंदाज वेगवेगळ्या लांबीचे आहेत, ज्याचा त्यांना फायदा झाला, त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे.

असा खेळला हैदराबाद संघ  

163 धावांच्या आव्हानाचा पाठलगा करताना केन विल्यमसन आणि अभिषेख शर्मा यांनी 8.5 षटकांत 64 धावांची दमदार सलामी दिली. अभिषेक शर्माने 32 चेंडूत 42 धावांची महत्वाची खेळी केली. कर्णधार केन विल्यमसन याने 46 चेंडूत चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाटी दुखापत झाल्यानंतर 17 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि एडन मार्करन यांनी तुफानी फटकेबाजी करत हैदराबादला विजय मिळवून दिला. निकोलस पूरनने 18 चेंडूत 34 तर मार्करन याने 8 चेंडूत 12 धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर, टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन तर मार्को आणि उम्रान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर गुजरातचा एक गडी धावचीत झाला. 

गुजरातची फलंदाजी 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरात टायटन्सने फलंदाजीसाठी येत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीला आलेले डेविड वेड आणि शुभमन गिल मैदानावर तग धरू शकले नाही. वेडने १९ तर शुभमन गिलने ७ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या साई सुदर्शनने अकरा धावा केल्या.

तर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्यांने जबाबदारीने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावत ५० धावा केल्या. काही काळासाठी अभिनव मनोहर (35) याची त्याला साथ देखील मिळाली. ज्यामुळे 20 षटकात 7 गडी गमावात गुजरातने 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी