मी नेहमी तुम्हाला मिस करेन आणि प्रेम करत राहीन..वडिलांच्या आठवणीत भावूक झाला ऋषभ पंत

IPL 2022
Updated Apr 04, 2022 | 20:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)चा कर्णधार ऋषभ पंतने आपल्या वडिलांच्या आठवणीत इमोशनल पोस्ट लिहिली आहे. 

rishabh pant
मी नेहमी तुम्हाला मिस करेन आणि प्रेम करत राहीन - ऋषभ पंत 
थोडं पण कामाचं
  • रविवारी पंतने आपल्या वडिलांसाठी भावूक संदेश लिहिला होता.
  • ५ एप्रिलला पंतच्या वडिलांच्या निधनाला ५ वर्षे होतील.
  • पंतच्या वडिलांचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले होते.

मुंबई: युवा विकेटकीपर  ऋषभ पंत (Rishabh Pant)ने इन्स्टाग्रामवर आपले दिवंगत वडिलांसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. पंतच्या वडिलांचे २०१७मध्ये निधन झाले होते. नोव्हेंबर २०२१मध्ये त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांचे फुफ्फुसांच्या कॅन्सरने निधन झाले. या दोघांनी ऋषभ पंतच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतने नुकताच मुलाखतीत याचा उल्लेखही केला होता.

अधिक वाचा -  युक्रेन युद्ध असूनही डिझेल-पेट्रोल होणार स्वस्त...

यातच ५ एप्रिलला पंतच्या वडिलांच्या निधनाला ५ वर्षे होतील. पंतच्या वडिलांचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले होते. पंत आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रूडकीला गेला होता आणि त्यानंतर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा पहिला सामना खेळण्यासाठी गेला होता. त्याने बंगळुरूविरुद्धच्या या सामन्यात केवळ ३३ बॉलमध्ये हाफ सेंच्युरी ठोकली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

रविवारी पंतने आपल्या वडिलांसाठी भावूक संदेश लिहिला होता. त्याने लिहिले, मी जो होतो तेव्हाही माझ्या वडिलांनी प्रेम केले. मला जे बनायचे होते त्यांनी त्यात मला साथ दिली. त्यांच्या या मजबूत पाठिंब्याने मला एक सुरक्षा वाटत होते. डॅड तुम्ही आता स्वर्गात आहात आणि मला माहीत आहे की तुम्ही तेथून माझी सुरक्षा करत असाल. माझे वडील असण्याबद्दल थँक्यू. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करेन. 

अधिक वाचा - भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल 

पंतने आयपीएल सुरूवात होण्यापूर्वीच म्हटले होते की त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा, त्याच्या वडिलांप्रमाणे होते. त्यांनी त्याचे करिअर घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले, मला परत जाऊन त्यांना भेटायचे होते. मी माझ्या वडिलांना खूप मिस करतो. जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी क्रिकेट खेळत होतो. तारक सर मला माझ्या वडिलांप्रमाणे होते. त्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा मी पुन्हा खेळण्यात व्यस्त होतो. मी आज जो काही आहे त्यांच्यामुळेच आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी