आयपीएलमधून पैसे कमवेन आणि आई-वडिलांसाठी घर खरेदी करेन - मुंबई इंडियन्सचा खेळाडू

IPL 2022
Updated Apr 04, 2022 | 17:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

फेब्रुवारीमध्ये बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मेगा लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सच्या या प्रतिभावान खेळाडूला १.७ कोटी रूपयांना खरेदी केले होते. 

tilak verma
आयपीएलमधून पैसे कमवेन आणि आई-वडिलांसाठी घर खरेदी करेन  
थोडं पण कामाचं
  • मेगा लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने या प्रतिभावान युवा फलंदाजांला १.७ कोटी रूपयांना खरेदी केले होते.
  • आयपीएलमधून होणाऱ्या कमाईतून त्याला हे घर खरेदी करायचे आहे. 
  • आयपीएलचा हा पैसा मला बाकी करिअरसाठी स्वतंत्रपणे खेळण्याचे स्वातंत्र्य देईल. 

मुंबई: इंडियन प्रीमियर  लीग(IPL 2022) दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असलेल्या तिलक वर्मा या महत्त्वाकांक्षी स्पर्धेतून मिळणाऱ्या पैशाने तो आई-वडिलांसाठी घर खरेदी करणार आहे. त्याच्याकडे स्वत:चे घर नाही आहे त्यामुळे त्याला आयपीएलमधून होणाऱ्या कमाईतून त्याला हे घर खरेदी करायचे आहे. 

अधिक वाचा - एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचे विलीनीकरण, शेअर्समध्ये तेजी

फेब्रुवारीमध्ये बंगळुरूत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मेगा लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने या प्रतिभावान युवा फलंदाजांला १.७ कोटी रूपयांना खरेदी केले होते. क्रिकबझशी बोलताना सांगितले, ज्या दिवशी आयपीएलमध्ये लिलाव सुरू होता तेव्हा मी आपल्या कोचसोबत व्हिडिओ कॉलवर होतो. जसजशी बोली वाढत गेली माझे कोच रडायलाच लागले. मला निवडल्यानंर मी माझ्या आई-वडिलांना फोन केला तेही कॉलवर रडू लागले. माझी आई बोलूच शकत नव्हती. 

लहानपणापासूनच आम्ही खूप आर्थिक संकट पाहिले आहे. माझ्या वडिलांचा पगार तुटपुंजा. त्या तुटपुंज्या पगारातच त्यांना माझ्या क्रिकेटचा खर्च तसेच मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च पाहावा लागत असेल.गेल्या काही वर्षात मी काही स्पॉन्सरशिप आणि मॅच फीसमुळे माझ्या क्रिकेटिंगचा खर्च करत होतो. तिलक पुढे म्हणाला, आमच्याकडे अद्याप एकही घर नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये मी जे काही कमावले आहे त्यातून मी आई-वडिलांसाठी घर खरेदी करेन. आयपीएलचा हा पैसा मला बाकी करिअरसाठी स्वतंत्रपणे खेळण्याचे स्वातंत्र्य देईल. 

अधिक वाचा - SSC Exam 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांना लागली सुट्टी

तिलक वर्माचा जोरदार सिक्स

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला सुरूवातीला झटके बसल्यानंतर इशान किशनसोबत मिळून तिलक वर्माने डाव सांभाळला. १२व्या ओव्हरमध्ये तिलक वर्माने रियान परागच्या बॉलवर मिडऑफवरून सिक्स ठोकला. मात्र हा बॉल सरळ जाऊन तेथे उभ्या असलेल्या कॅमेरामनच्या डोक्यावर पडला. त्यांनी स्वत:ला हटवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बॉल डोक्याला लागला होता. यानंतर ट्रेंट बोल्टने मेडिकल टीम बोलवण्यासाठी इशारा केला मात्र कॅमेरामनने त्यास नकार दिला. तो लगेचच आपल्या कामाला लागला. स्टेडियममधील कोणाला बॉल लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी