Robin Uthappa IPL 2022 | मुंबई : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात या संघाने ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. मात्र अशातच रॉबिन उथप्पाने मुंबई इंडियन्समधील खेळाडूंच्या निवडीबाबत मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. उथप्पाने मुंबईच्या संघावर जाहीरपणे मोठे आरोप केले आहेत. तसेच संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचेही त्याने सांगितले आहे. ("I was forcibly removed from the team by the Mumbai Indians," said Robin Uthappa).
अधिक वाचा : ..मग तुम्ही पाकिस्तान सोडा अन् भारतात जा
सीएसकेकडून सलामीवीर म्हणून जबाबदारी स्वीकारणारा महान भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाने मुंबई इंडियन्सवर मोठे आरोप केले आहेत. उथप्पाने सांगितले की, २००८ मध्ये जेव्हा तो मुंबई इंडियन्सकडून खेळायचा तेव्हा त्याची जबरदस्तीने आरसीबीच्या संघामध्ये हकालपट्टी करण्यात आली होती. उथप्पाने खुलासा केला की त्याला मुंबईतून आरसीबीच्या संघात जायचे नव्हते, परंतु त्यावेळी ट्रान्सफर पेपरवर सही करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
अधिक वाचा : Kulgam Anantnag Encounter : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठार
रॉबिन उथप्पाने रविचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना या गोष्टींचा खुलासा केला. उथप्पा म्हणाला, "मला ट्रान्सफर पेपरवर सही करायची नव्हती. मुंबई इंडियन्सच्या संघातील एका व्यक्तीने मला सांगितले की जर मी ट्रान्सफर पेपरवर सही केली नाही तर मला मुंबईच्या प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. तो पुढे म्हणाला की, 'मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप तणावातून जात होतो. आरसीबी सोबतच्या माझ्या पहिल्या हंगामात मी पूर्ण नैराश्यात होतो. त्या हंगामात मी एकही सामना चांगला खेळू शकलो नाही.
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाबाबत जेव्हा कधी भाष्य केले जाते तेव्हा सर्वात आधी मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव घेतले जाते. मुंबईच्या संघाला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटले जाते. या संघाने सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. संघ व्यवस्थापनाचा खेळाडूंवर असलेला विश्वास हे या संघाच्या यशाचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. पण आता उथप्पाने ज्या पद्धतीने संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत ते धक्कादायक आहेत. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.