Mumbai Indians 3 Flop Players । मुंबई : आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आणि 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएलचा १५ वा हंगाम एका वाईट स्वप्नाप्रमाणे गेला. मुंबई इंडियन्सला पहिल्यांदाच एका हंगामात १० पराभवांना सामोरे जावे लागले आणि केवळ ४ सामने जिंकता आले. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमागे ३ खेळाडूंचा मोठा हात होता. हे तिन्ही खेळाडू या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरले. (In IPL 2022 Mumbai had to accept defeat due to these 3 players).
अधिक वाचा : भारतातील एकमेव ट्रेन जिथे आहे मोफत प्रवास, वाचा सविस्तर
आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सचा (MI) आक्रमक ऑलराउंडर खेळाडू कायरन पोलार्डची खेळी खूपच निराशाजनक राहिली. कायरन पोलार्ड हा टी-२० मधील सर्वात यशस्वी ऑलराउंडर खेळाडूंपैकी एक आहे. मात्र या हंगामात तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला. कायरन पोलार्डने या हंगामात एकूण ११ सामने खेळले, या सामन्यांमध्ये त्याने १४.४० च्या सरासरीने केवळ १४४ धावा केल्या. त्याच पद्धतीने गोलंदाजीतही तो फ्लॉप ठरला. त्याने या हंगामात ८.९३ च्या इकॉनॉमीने धावा देत केवळ ४ बळी घेतले.
मुंबई इंडियन्सने या हंगामात वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला दीड कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र संघाचा हा निर्णय संघाच्याच आंगलट आला. कारण मिल्सने आयपीएल २०२२ मध्ये ५ सामन्यात फक्त ६ बळी घेतले. यादरम्यान त्याची सरासरी ११ पेक्षा जास्त होती. यामुळेच त्याला नंतर संघातून वगळण्यात आले होते. टायमल मिल्सला ४ वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. पण यावेळीही तो फ्लॉप ठरला आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिल्स आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला.
मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील या हंगामात खराब कामगिरी करून चाहत्यांना निराश केले. रोहित शर्मा या हंगामात फलंदाज आणि कर्णधार म्हणून दोन्हीही बाजूने फ्लॉप ठरला. एक फलंदाज म्हणून रोहित शर्मासाठी हा हंगाम त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट हंगाम ठरला. आयपीएल २०२२ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये १९.१४ च्या सरासरीने केवळ २६८ धावा केल्या. या हंगामात त्याचा स्ट्राइक रेट १२०.१८ असा होता. लक्षणीय बाब म्हणजे या हंगामात हिटमॅन रोहितला एकही अर्धशतक झळकवता आले नाही.