India World Cup squad : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात आयपीएलच्या चेन्नई- मुंबई संघाचा बोलबाला 

IPL 2019
Updated Apr 15, 2019 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

India World Cup squad : आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर झाली असून १५ सदस्यीय संघात सध्याच्या आयपीएल संघातील खेळाडूंचा विचार करता चेन्नई आणि मुंबई संघाचा दबदबा दिसतो आहे. 

India World Cup squad
वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात चेन्नई आणि मुंबईतील संघाचा बोलबाला आहे.  

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या संघात भारताच्या बेस्ट १५ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. सध्या भारतात आयपीएलचा फिव्हर सुरू आहे. या संघावर नजर टाकली असता १५ सदस्यीय संघात चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियनच्या खेळाडूंचा बोलबाला दिसतो आहे. 

एकूण १५ सदस्यीय भारतीय स्कॉडमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघातील ३, मुंबई इंडियन्स संघातील ३, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २, सनराईजर्स हैदराबाद संघातील २, किंग्ज इलेवन पंजाब संघातील २, कोलकता नाईट रायडर्समधील २, दिल्ली कॅपिटल्स संघातील  एका सदस्याचा समावेश आहे.  या संघात राजस्थान रॉयल्सच्या एकाही प्लेअरला स्थान मिळालेले नाही. 

चेन्नई सुपरकिंग्ज 

 1. महेंद्र सिंग धोनी 
 2. केदार जाधव 
 3. रविंद्र जडेजा 

मुंबई इंडियन्स

 1. रोहित शर्मा 
 2. हार्दिक पांड्या 
 3. जसप्रित बुमराह

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

 1. विराट कोहली
 2. युजवेंद्र चहल 

सनराईजर्स हैदराबाद

 1. भुवनेश्वर कुमार 
 2. विजय शंकर 

किंग्ज इलेवन पंजाब 

 1. के. एल. राहुल
 2. मोहम्मद शमी 

कोलकता नाईट रायडर्स 

 1. दिनेश कार्तिक 
 2. कुलदीप यादव 

दिल्ली कॅपिटल्स 

 1. शिखर धवन 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
India World Cup squad : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात आयपीएलच्या चेन्नई- मुंबई संघाचा बोलबाला  Description: India World Cup squad : आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर झाली असून १५ सदस्यीय संघात सध्याच्या आयपीएल संघातील खेळाडूंचा विचार करता चेन्नई आणि मुंबई संघाचा दबदबा दिसतो आहे. 
Loading...
Loading...
Loading...