रवी शास्त्रींनी या भारतीय गोलंदाजांचे केले तोंडभरून कौतुक, वर्ल्डकपमध्ये त्याची जाणवली कमतरता

IPL 2022
Updated Apr 06, 2022 | 14:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सनरायजर्स हैदराबादकडून खेळत असलेल्या एका भारतीय खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये या क्रिकेटरची कमतरता जाणवल्याचे ते म्हणाले. 

t natarajan
रवी शास्त्रींनी या भारतीय गोलंदाजांचे केले तोंडभरून कौतुक 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी नटराजनचे केले कौतुक
  • शास्त्रींनी सांगितले टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपमध्ये कमतरता जाणवली
  • दुखापतीमुळे दीर्घकाळ टीम इंडियातून बाहेर

मुंबई: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी नटराजनने डेथ ओव्हर्समध्ये गेलेल्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. भारतीय संघाला गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याची कमतरता जाणवली असेही ते म्हणाले. २०२१च्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक कसोटी विजयामुळे तो चर्चेत आला होाता. नटराजन मार्च २०२१मध्ये इंग्लंडविरुद्धच्या डोमेस्टिक सीरिजदरम्यान गुडघा आणि खांद्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नव्हता. Indias former coach ravi shastri praise to t natrajan

अधिक वाचा - बजरंगबलीला राशीनुसार द्या या गोष्टींचा नैवेद्य

डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यात नटराजनचा हातखंडा

सनरायजर्स हैदराबादसाठी आयपीएल २०२२च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तामिळनाडूचा हा वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ४ विकेट घेतल्या आहेत. शास्त्री यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोच्या हवाल्याने सांगितले, मी त्याच्यासाठी खूप खुश आहे. आम्हाला त्याची वर्ल्डकपमध्ये कमतरता जाणवली. तो अनफिट होता. तो इंग्लंडविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता. जेव्हा आम्ही वनडे मालिका खेळत होते. तेव्हा त्याला संघात सामील करण्यात चुकलो होते. तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज होता.तो यॉर्कर खूप कुशलतेने खेळतो. 

नटराजन होता टीम इंडियासाठी लकी गोलंदाज

गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाला आपल्या २०२०-२१ या दौऱ्यात तीनही प्रकारांमध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. तेव्हा शास्त्री म्हणाले की नटराजन त्यांच्यासाठी भाग्यवान गोलंदाज होता. माजी कोच म्हणाले, मी त्याला ज्या सामन्यासाठी निवडले त्यात आम्ही विजय मिळवला. टी-२० पदार्पणात भारताने सामना जिंकला. 

अधिक वाचा - करिना कपूर-खानच्या कारचा अ‍ॅक्सिडेंट

१०.७५ कोटींना खरेदी केलेला खेळाडू फ्लॉप

सनरायजर्स हैदराबादच्या संघाने मेगा लिलावात वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनला मोठ्या किंमतीला खरेदी केले होते. त्यांनी निकोलस पूरनला १०.७५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. मात्र इतकी मोठी रक्कम खर्च करूनही हैदराबादला याचा फायदा मिळालेला नाही. निकोलस पूरन या हंगामात फ्लॉप दिसत आहे. त्याने आतापर्यंतच्या २ सामन्यांत केवळ ३४ धावा केल्यात. हंगामातील पहिल्या सामन्यात पूरन ०वर बाद झाला होता आणि एक लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात २४ बॉलमध्ये ३४ धावांची खेळी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी