IPL 2019 Final: चेन्नई आणि मुंबई कोण मारेल आज बाजी ? 

IPL 2019
Updated May 12, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

IPL 2019 FINAL, Today's match: तीन-तीन वेळा आयपीएलचा किताब जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई आज एकमेकांविरोधात आज आयपीएल १२ च्या फायनलसाठी मैदानात उतरतील. या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

CSK vs MI IPL final 2019
IPL 2019 Final: चेन्नई आणि मुंबई कोण मारेल आजची बाजी ?   |  फोटो सौजन्य: Twitter

IPL 2019 FINAL, Today's match, MI vs CSK Preview: इंडियन प्रीमियर लीगच्या १२ व्या सीझनचा शेवटचा सामना अशा दोन टीममध्ये होणार आहे. ज्या टीमनं याआधी तीन-तीन वेळा किताब आपल्या नावावर केला आहे. आज होणाऱ्या फायनलमध्ये आयपीएलचा किताबासाठी गत विजेता चेन्नई सुपर किंग्सचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. दोन्ही टीम चौथ्यांदा फायनलमध्ये आमने-सामने आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी दोन टीममध्ये हा सामना निश्चित रूपात मनोरंजक होईल. या दोन्ही टीममध्ये याआधी झालेल्या फायनलच्या तीन सामन्यांपैकी २ सामन्यात मुंबईला विजय मिळाला आहे. तर एक वेळा चेन्नईनं विजय मिळवला आहे. हा विजय त्यांना २०१० मध्ये मिळाला होता. 

मुंबईची चेन्नईविरूद्ध विजयाची हॅट्रिक 

चेन्नई या टीमला असं मानलं जातं की, ही टीम ग्रुप स्टेजवर दमदार खेळ करते. तसंच मुंबईला हळू सुरूवात करणारी टीम म्हणता येईल. मुंबईनं हळू सुरूवात करत टॉप स्थानावर पोहोचली. तर चेन्नई सुरूवातीपासून पॉईट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होती.त्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. मुंबईनं त्यानंतर चेन्नईला पहिल्या स्थानावरून हटवलं होतं. चेन्नईसाठी आणखीन एक भीतीदायक गोष्ट आहे की, या सामन्याच्या आधी दोन्ही टीम याच सीझनमध्ये तीन वेळा आमने-सामने आली आहे आणि तिन्ही वेळा मुंबईचा विजय झाला आहे. दोनवेळा ग्रुप स्टेजमध्ये आणि एकदा क्वॉलिफायर- १ मध्ये मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं होतं. 

चेन्नईनं आताच क्वॉलिफायर-२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर मात केला. ते बघता फायनलमध्ये मुंबईचं पारडं भारी आहे हे म्हणणं देखील चुकीचं ठरेल. चेन्नईच्या स्पिनर्संनी दमदार प्रदर्शन करत दिल्लीला २० ओव्हरमध्ये नऊ विकेट्स गमावत १४७ धावांची संख्येच्या पुढे जाऊन दिलं नाही.  हे लक्ष्य शेन वॉट्सन आणि फाफ डु प्लेसिसच्या जोरावार पूर्ण करण्यात आलं. 

दोन्ही टीम अशाप्रकारे असतील

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, कृणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मैक्लेनघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फॉफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, मिचेल सैंटनर, डेविड विली, सैम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा

हा सामना आज ७.३० ला सुरू होईल. तसंच तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर बघू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019 Final: चेन्नई आणि मुंबई कोण मारेल आज बाजी ?  Description: IPL 2019 FINAL, Today's match: तीन-तीन वेळा आयपीएलचा किताब जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई आज एकमेकांविरोधात आज आयपीएल १२ च्या फायनलसाठी मैदानात उतरतील. या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola