Watch Video: जेव्हा केदार जाधव धोनीला भरवतो घास

IPL 2019
Updated Apr 15, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

IPL 2019: केदार जाधवनं चेन्नई सुपरकिंग्जच्या सातव्या मॅचच्या विजयानंतर कॅप्टन कूल धोनीला आपल्या हातानं जेवायला घातलं. सीएसकेनं कोलकाता नाईटरायडर्सला त्यांच्याच घरात पराभूत केलं.

M S Dhoni
धोनी-केदारचा ब्रोमांस  |  फोटो सौजन्य: Twitter

कोलकाता: यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं शानदार प्रदर्शन सुरू आहे. एम. एस. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये सीएसकेनं आयपीएलच्या १२ पैकी ८ मॅच खेळल्या, त्यातील सात मॅच जिंकण्यात चेन्नईच्या टीमला यश मिळालंय. सीएसकेनं रविवारी कोलकातासोबत झालेल्या मॅचमध्ये पाच विकेटनं विजय मिळवला. ही मॅच कोलकाता नाईटनायडर्सच्या होमग्राऊंडवर झाली. लेग स्पिनर इमरान ताहिरनं मॅचमध्ये २७ रन्स देत चार विकेट घेतल्या. त्यामुळं त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळाला. तर महेंद्र सिंह धोनीनं फास्ट १६ रन्स बनवले. केदार जाधवनं ही २० रन्सची खेळी खेळली. सुरेश रैना आणि रवींद्र जडेजानं सीएसकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

मॅचनंतर केदार जाधव आणि महेंद्र सिंह धोनी दरम्यान ब्रोमांस म्हणजेत भावांमधील प्रेम दिसून आलं. केदार जाधव हा धोनीचा खूप चांगला मित्र आहे. जाधवनं कॅप्टन कूल धोनीला आपल्या प्लेटमधील जेवण प्रेमानं भरवलं. तेव्हा धोनी चहा पित होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. जाधव-धोनीचा ब्रोमांस त्यांचे फॅन्स खूप आनंदानं स्वीकारत आहेत.

पाहा व्हिडिओ:

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bromance

A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

यापूर्वी बघायला मिळालं होतं की, केदार जाधवनं धोनीची खूप गंमत केली होती. तो व्हिडिओ सुद्धा खूप वायरल झाला होता. या व्हिडिओमधून चेन्नई टीमचे खेळाडूंचा आपआपसातील ताळमेळ किती चांगला आहे हे दिसून येतं. केदार जाधव कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचा खूप आदर करतो. धोनीच्या नेतृत्वातच केदारनं पार्ट टाईम ऑफ स्पिनची सुरूवात केली होती. त्यानंतरच केदार जोडी तोडण्यासाठी प्रसिद्ध झाला. केदार जाधवनं यापूर्वीही स्पष्ट केलंय की, तो महेंद्र सिंह धोनी मुळेच एक यशस्वी क्रिकेटपटू बनू शकला आहे.

जाधवनं म्हटलं होतं, ‘मी आज ज्याप्रकारचा खेळाडू आहे, ते केवळ धोनीमुळेच. त्यांनी नेहमी मला प्रोत्साहन दिलं. धोनीनं पहिल्यांदा मला झिम्बॉव्वेमध्ये पाहिलं आणि नंतर न्यूझिलंडच्या विरुद्ध दोन ओव्हर खेळायला सांगितले. मी आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या होत्या. त्यानंतर सर्व सीनिअर्य विराट कोहली, रोहित शर्मा यांनी माझं प्रोत्साहन वाढवलं. यांनी मला इतका विश्वास दिला की मला कधी मी पार्ट टाईम बॉलर असल्याचा दबाव जानवला नाही.’

चेन्नई सुपरकिंग्ज यंदाच्या आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये क्वालिफाय झालेली पहिली टीम बनलीय. चेन्नईनं सात मॅच जिंकत १४ गुण मिळवले आहेत आणि गुणतालिकेत चेन्नई अव्वल स्थानावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Watch Video: जेव्हा केदार जाधव धोनीला भरवतो घास Description: IPL 2019: केदार जाधवनं चेन्नई सुपरकिंग्जच्या सातव्या मॅचच्या विजयानंतर कॅप्टन कूल धोनीला आपल्या हातानं जेवायला घातलं. सीएसकेनं कोलकाता नाईटरायडर्सला त्यांच्याच घरात पराभूत केलं.
Loading...
Loading...
Loading...