IPL 2019 : आर. अश्विनला १२ लाखांचा दंड; पण कशासाठी?

IPL 2019
Updated Apr 21, 2019 | 20:24 IST | टाइम्स नाऊ हिंदी

IPL 2019 : धिम्या गतीने गोलंदाजी केल्याचा फटका किंग्ज इलेव्हनचा कॅप्टन आर. अश्विनला बसला आहे. आयपीएलने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यंदाच्या सिझनमध्ये ही कारवाई झालेल्या अश्विन चौथा कॅप्टन आहे.

R. Ashwin
धिम्या गोलंदाजीमुळे अश्विनला दंड  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • आयपीएल सिझनमध्ये आर. अश्विन पुन्हा एकदा चर्चेत
  • धिम्या गोलंदाजीमुळे आयपीएलने ठोठावली दंडात्मक शिक्षा
  • यंदाच्या सिझनमध्ये दंड झालेला अश्विन चौथा कॅप्टन

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या १२ व्या सिझनमध्ये वाद आणि रविचंदन अश्विन हे जणू समीकरणच बनलं आहे. शनिवारी दिल्लीत दिल्ली कॅपिटल्ससंघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यातच धिम्या गतीने गोलंदाजी केल्याचा फटकाही संघाला बसला. याप्रकरणी आयपीएलने अश्विनला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यंदाच्या सिझनमध्ये धिम्या गतीनं गोलंदाजी केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या अश्विन चौथा कॅप्टन आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य राहणे यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटलनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाच विकेट्सनी पराभव केला. पण, धिम्या गोलंदाजीमुळे अश्विनला दंड भरावा लागणार आहे. याप्रकरणी आयपीएलने म्हटलं आहे की, टी-२० लीग आचारसंहितेनुसार किमान ओव्हर रेट न राखल्याप्रकरणी पंजाबच्या संघावर करवाई होत आहे. ही संघाची पहिली चूक असल्यामुळे कॅप्टन अश्विनला १२ लाख रुपये दंड करण्यात येत आहे. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने किंग्स इलेव्हनला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यात क्रिस गेलने ३७ बॉलमध्ये ६९ रन्सची दमदार खेळी खेळल्यामुळे पंजाबला ७ बाद १६३ असा समाधानकारक स्कोरअ करता आला. त्यानंतर दिल्लीने तोडीस तोड उत्तर देत दोन बॉल आणि पाच गडी राखून विजय मिळवला.

अश्विन काय म्हणतो?

सामन्यानंतर अश्विन म्हणाला, ‘मैदानावर दव असल्यामुळे आम्ही केलेला स्कोअर कमी पडेल असे वाटत होते. कारण स्पिनर्संना बॉलवर ग्रीप घेता येत नव्हती. गेलच्या चांगल्या खेळानंतरही मधल्या ओव्हर्समध्ये आमचे इतर खेळाडू आऊट झाले. शेवटच्या ओव्हर्समध्ये आम्ही आणखी १२-१३ रन्स केल्या असत्या तर, सामना जिंकता आला असता.’

दिल्ली तिसऱ्या, पंजाब चौथ्या स्थानावर

सामन्यात अश्विनने १४ बॉलमध्ये १६ रन्स केल्या होत्या. हरप्रीत बरारने १२ बॉलमध्ये २० रन्स केल्या होत्या. या दोघांच्या खेळीमुळे एक समाधानकारक स्कोअर उभरण्यात आला होता. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावा जोडल्यामुळं परिस्थिती बदलली आणि सामना दिल्लीच्या हातात आला. कॅप्टन अय्यर शेवटच्या बॉलपर्यंत मैदानावर होता. पंजाबने १० मॅचमध्ये ५ जिंकून सध्या गुण तक्त्यात चौथे स्थान मिळवले आहे. त्यांचा पुढचा सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल १० पैकी सहा सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019 : आर. अश्विनला १२ लाखांचा दंड; पण कशासाठी? Description: IPL 2019 : धिम्या गतीने गोलंदाजी केल्याचा फटका किंग्ज इलेव्हनचा कॅप्टन आर. अश्विनला बसला आहे. आयपीएलने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यंदाच्या सिझनमध्ये ही कारवाई झालेल्या अश्विन चौथा कॅप्टन आहे.
Loading...
Loading...
Loading...