आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा झाली अशी कामगिरी, मुंबईच्या बॉलर्सनी केली कमाल

IPL 2019
Updated Apr 19, 2019 | 14:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ipl 2019: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रोहितने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईच्या बॉलर्सनी या सामन्यात वेगळाच रेकॉर्ड केला.

delhi capitals vs mumbai indian
दिल्ली कॅपिटल्स वि मुंबई इंडियन्स 

मुंबई: आयपीएलच्या १२व्या हंगामातील ३४व्या सामन्यात गुरूवारी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सला आपल्याच घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून ४० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. चांगली सुरूवात केल्यानंतर दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही आणि दिल्लीला २० ओव्हरमध्ये ९ बाद १२८ धावाच करता आल्या. या विजयासोबत मुंबईला पॉईंटटेबलमध्ये एका स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित शर्माचा मुंबई संघ पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 

मुंबईच्या बॉलर्सनी सुरूवातीपासूनच दिल्लीवर आक्रमण करण्यास सुरूवात केली होती. दिल्लीच्या फलंदाजांना त्यांनी मोकळेपणाने फलंदाजी करूच दिली नाही. दिल्लीला पहिला झटका शिखर धवनच्या रूपात बसला. त्याने २२ चेंडूत ३५ धावा केल्या. चहरने त्याला बाद केले. यावेळी दिल्लीची धावसंख्या ४९ इतकी होती. यानंतर दिल्लीच्या संघाची पडझड झाली. ७६ धावसंख्या होईपर्यंत दिल्लीचे पाच फलंदाज बाद झाले होते.

 

हा सामना केवळ मुंबई जिंकलाच नाही तर मुंबईच्या बॉलर्सनी आयपीएलच्या इतिहासात एक असा रेकॉर्ड केला जो याआधी कधीच बनला नव्हता. पृथ्वी शॉ सोडला असताना दिल्लीचे पहिले सर्व पाच फलंदाज बोल्ड आऊट झाले. सगळ्यात आधी शिखर धवनला चहरने ३५ धावांवर बोल्ड केले. यानंतर कॉलिन मुन्रोला कृणाल पांड्याने, कर्णधार श्रेयस अय्यरला चहरने, ऋषभ पंत आणि अक्षर पटेलला बुमराहने बोल्ड केले. याआधी आयपीएलच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते जिथे पहिले पाच फलंदाज बोल्ड आऊट झाले. 

पॉईंट टेबलची स्थिती

३४व्या सामन्यातर आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे १२ पॉईंट आहेत. तिसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. त्यांचे १० गुण आहेत. त्यानंतर अनुक्रमे किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा झाली अशी कामगिरी, मुंबईच्या बॉलर्सनी केली कमाल Description: ipl 2019: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रोहितने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईच्या बॉलर्सनी या सामन्यात वेगळाच रेकॉर्ड केला.
Loading...
Loading...
Loading...