मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर अंबानींची सून श्लोकाने केला जल्लोष

IPL 2019
Updated May 13, 2019 | 12:12 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

आयपीएलच्या १२व्या हंगामातील अखेरच्या रोमांचक सामन्यात नीता अंबानी यांचा संघ मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयानंतर आकाश अंबानी, पत्नी श्लोका मेहता, अनंत अंबानी आणि त्याची खास मैत्रीण राधिका मर्चंटने असे सेल

ambani family
अंबानी कुटुंब  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: आयपीएलच्या १२व्या हंगामातील अखेरचा सामना उत्कंठावर्धक ठरला. बिझनेस बुमन नीता अंबानी यांच्या संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आणि चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. हैदराबादमध्ये झालेल्या या जबरदस्त सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर एका धावेने मात केली. मुंबई इंडियन्सच्या या मोठ्या विजयानंतर अंबानी कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. 

या दरम्यान मैदानावर नीता अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि त्याची खास मैत्रीण राधिका मर्चंटही होती. सर्वांनी मुंबई इंडियन्सची ब्लू जर्सी घातली होती. तर दुसरीकडे तेथून घरी परतताना खासगी एअरपोर्टवर श्लोका मेहताचा आनंद पाहण्यालायक होता. ती चीअर करत असताना मीडियामध्ये कैद झाली. या दरम्यान श्लोकाने फ्लोरल मीडिया स्कर्ट घातला होता तर स्ट्रेपी व्हाईट टॉप घातला होता. तिच्यामागे आकाश अंबानी चेकचा शर्टमध्ये दिसत होता. अनंत अंबानीही सकाळी एअरपोर्टवर दिसला. तो ब्लू टीशर्ट आणि ग्रे रंगाच्या पँटमध्ये होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#anantambani snapped today morning at the private airport. #mumbaiindians #iplfinals @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yippee the trophy comes home,???. #akashambani with the grand IPL trophy

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रविवारी आकाश, श्लोका, अनंत आणि राधिका खाजगी एअरपोर्टने हैदराबादला पोहोचले होते. त्यांचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आकाशने स्काय ब्लू टी शर्ट घातला आहे तर श्लोकाने फ्लोरल आऊटफिट कॅरी केला आहे. अनंतची खास मैत्रीण राधिकाही हैदराबादला पोहोचली होती. तिने मुंबई इंडियन्सची जर्सी घातली होती. 

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १२व्या हंगामात मिळवलेला हा विजय खास होता. कारण त्यांनी आयपीएलच्या फायनलच्या इतिहासात तिसऱ्यांदा १५०हून कमी धावसंख्या असतानाही प्रतिस्पर्धी संघाला रोखले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर अंबानींची सून श्लोकाने केला जल्लोष Description: आयपीएलच्या १२व्या हंगामातील अखेरच्या रोमांचक सामन्यात नीता अंबानी यांचा संघ मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयानंतर आकाश अंबानी, पत्नी श्लोका मेहता, अनंत अंबानी आणि त्याची खास मैत्रीण राधिका मर्चंटने असे सेल
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola