IPL 2019 MI vs CSk: वाढदिवसाच्या दिवशीच भडकला पोलार्ड

IPL 2019
Updated May 13, 2019 | 12:40 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IPL 2019: मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज किरेन पोलार्ड अखेरच्या सामन्यात अंपायरच्या निर्णयावर नाखूश दिसला. त्याने आपल्या वाढदिवसाला नाबाद ४१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

pollard
पोलार्ड 

हैदराबाद: मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज किरेन पोलार्डने रविवारी आपला ३२वा वाढदिवस साजरा केला. पोलार्डने आपल्या वाढदिवसाला मुंबईला चेन्नईविरुद्ध विजय मिळवून देत आयपीएलचे जेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने आपल्या वाढदिवसाला शानदार फलंदाजी केली. त्याने २५ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावांची खेळी केली. दरम्यान, आपल्या या खेळीदरम्यान तो अंपायर नितीन मेनन यांच्या निर्णयावर नाखूश दिसला आणि त्याने आपला राग व्यक्त केलाही. 

खरंतर, मुंबई इंडियन्सच्या अखेरच्या ओव्हरमध्ये पोलार्ड स्ट्राईकवर होता. त्याच्यासमोर ड्वायेन ब्रावो बॉलिंग करत होता. ब्रावोच्या पहिल्या बॉलवर पोलार्डला एकही रन काढता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरून वाद सुरू झाला. ब्रावोने ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल टाकला. पोलार्ड शफल करून ऑफ स्टम्पच्या पुढे आला यामुळे अंपायरने तो बॉल वाईड म्हणून घोषित केला नाही. यावेळी पोलार्डने अंपायरकडे रागाने पाहिले. मात्र अंपायर मेनन यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. 

यानंतर ब्रावोने तिसरा बॉल पुन्हा ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. अंपायर नितीन मेननने या बॉललाही वाईड म्हणून घोषित केले नाही. हे पाहून पोलार्डला आपला राग आवरला नाही. त्याने रागानेच आपली बॅट हवेत भिरकावली. 

पोलार्डने अशी व्यक्त केली नाराजी

पोलार्ड अंपायरच्या निर्णयामुळे त्रस्त होता. दोन चेंडूवर त्याला एकही रन काढता आला. मुंबईचा अपेक्षित स्कोर गाठता येत नव्हता. ब्रावो ओव्हरमधील चौथा बॉल टाकत होता. ब्रावो रन अप घेत येत होता तेव्हा पोलार्ड शफल करून ऑफ स्टम्पच्या बाहेर आला आणि गोलंदाजाने बॉल न टाकण्याचा निर्णय घेतला. हे पाहिल्यानंतर अंपायर इयान गोल्ड आणि नितीन मेनन पोलार्डशी बोलण्यास गेले. अंपायरने पोलार्डचा राग शांत कऱण्याचे प्रयत्न केले. ब्रावोने चौथा बॉल टाकला. यावर पोलार्डने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात मिचेल मॅक्लेनेघन बाद झाला. त्यानंतर चिडलेल्या पोलार्डने पुढच्या दोन बॉलवर दमदार चौकार लगावले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019 MI vs CSk: वाढदिवसाच्या दिवशीच भडकला पोलार्ड Description: IPL 2019: मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज किरेन पोलार्ड अखेरच्या सामन्यात अंपायरच्या निर्णयावर नाखूश दिसला. त्याने आपल्या वाढदिवसाला नाबाद ४१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola