IPL 2019: आयपीएलची सर्वाधिक जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स ठरला पहिला संघ

IPL 2019
Updated May 13, 2019 | 07:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IPL 2019 MI vs CSk: इंडियन प्रीमियर लीगच्या अखेरच्या सामन्यात किंग ठरला तो मुंबई इंडियन्सचा संघ. मुंबईने चेन्नईला हरवले.

mumbai indians
मुंबई इंडियन्स  |  फोटो सौजन्य: Twitter

हैदराबाद : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा आयपीएलचा विजेता ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर थरारक विजय मिळवला. अखेरच्या चेंडूत चेन्नईला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र मलिंगाने शार्दूल ठाकूरला पायचित केले आणि मुंबई इंडियन्सच्या संघावर शिक्कामोर्तब केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदे जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. मुंबईनंतर अधिक जेतेपदे जिंकणाऱ्यांच्या यादीत चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या नावावर तीन जेतेपदे आहेत. 

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४९ धावा केल्या. चेन्नईसमोर विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. खरेतर हे आव्हान चेन्नईसाठी काही फार मोठे नव्हते. मात्र अखेरच्या बॉलमध्ये बाजी पलटली आणि मुंबईच्या हाती विजय लागला. 

मुंबईने विजयासाठी दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाला उत्तर देताना चेन्नईची सुरूवात दमदार झाली. चेन्नईच्या शेन वॉटसनने ८० धावांची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. चेन्नईच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी ९ धावांची गरज बोती. यावेळी क्रीजवर वॉटसन आणि रवींद्र जडेजा खेळत होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अखेरची ओव्हर टाकण्याची जबाबदारी अनुभवी लसिथ मलिंगावर दिली. 

मलिंगाच्या पहिल्या बॉलवर एक रन, दुसऱ्या बॉलवर १ रन. तिसऱ्या बॉलवर २ रन्स मिळाले. यावेळी असे वाटत होते की मुंबईच्या हातून विजय निसटतोय की काय...मात्र वॉटसन चौथ्या बॉलवर रन आऊट झाला आणि सामन्याने रोमांचक वळण घेतले. यानंतर क्रीझवर शार्दूल ठाकूरने पाचव्या बॉलमध्ये दोन रन्स घेतले. शेवटच्या एका चेंडूवर चेन्नईला दोन रन्स हवेत होते. मात्र मलिांगने शार्दूलला एलबीडब्लू केले आणि मुंबईला विजय मिळवून दिला. 

चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस(२६), सुरेश रैना(८), एमएस धोनी(२) आणि अंबाती रायडू याने एक रन बनवला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने दोन, राहुल चहर, लसिथ मलिंगा आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: आयपीएलची सर्वाधिक जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स ठरला पहिला संघ Description: IPL 2019 MI vs CSk: इंडियन प्रीमियर लीगच्या अखेरच्या सामन्यात किंग ठरला तो मुंबई इंडियन्सचा संघ. मुंबईने चेन्नईला हरवले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola