धोनीच्या मुलीला किडनॅप करण्याची या बॉलिवूड अभिनेत्रीची धमकी

IPL 2019
Updated May 09, 2019 | 15:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने ट्विटरवर एक पोस्ट शअर केली आहे. हा फोटो शेअऱ करताना प्रीती झिंटाने लिहिलेय की ती धोनीची मुलगी झिवाची मोठी फॅन आहे. यासोबतच तिने झिवाला किडनॅप कऱण्याचीही धमकी दिली आहे.

ms dhoni and ziva
महेंद्रसिंग धोनी आणि झिवा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री प्रीती झिंटाचा संघ किंग्स इलेव्हन पंजाबला यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफआधीच गाशा गुंडाळावा लागला. त्यांनी अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला हरवत शेवट गोड केला.  यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती भारताचा क्रिकेटर आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेद्रसिंग धोनीसोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना प्रीती झिंटाने लिहिलेय, ती धोनीची मुलगी झिवाची मोठी फॅन आहे. फोटोवरून स्पष्टपणे लक्षात येत आहे की दोघांमध्ये हास्याचे वातावरण आहे. 

 

 

प्रीतीने फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिली की, कॅप्टन कूलचे खूप सारे फॅन्स आहे. त्यात मीही आहे. मात्र त्यापेक्षा मी आता धोनीची मुलगी झिवाची मोठी फॅन झाली आहे. तसेच मस्ती करताना प्रीतीने म्हटलंय, धोनीला आता मी सावध राहायला सांगेन, कारण मी झिवाला कधीही किडनॅप करू शकते. प्रीतीने यासोबत एक इमोजीही शेअर केला आहे. तसेच प्रीतीने इतरांनाही या फोटोसाठी कॅप्शन सुचवण्यास सांगितले. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Use your Power

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या क्यूटनेसवर तर सगळेच फिदा होतात. झिवाचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. नुकताच झिवाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात झिवा सोशल मीडियावरून इतरांना मतदान करण्याचे अपील करत आहे. जा आणि मतदान करा, जसे माझ्या मम्मी-पप्पांनी केले. धोनी आणि झिवाचा हा व्हिडिओ सोशलम मीडियावर काही मिनिटांत व्हायरल झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...