IPL 2019: राजस्थानची मुंबईवर ५ विकेटनी मात

IPL 2019
Updated Apr 20, 2019 | 20:37 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. या सामन्यात राजस्थानचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने केले होते.

steve smith
स्टीव्ह स्मिथ  |  फोटो सौजन्य: BCCL

जयपूर: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या आयपीएलच्या १२व्या हंगामातील ३६ व्या सामन्यात राजस्थानने दिल्लीवर ५ विकेटनी मात केली. जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सला १६२ धावांचे लक्ष्य मिळाले होते मात्र राजस्थानचे या हंगामात पहिल्यांदा नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर राजस्थानने ५ विकेट राखून विजय मिळवला. १७ वर्षीय युवा क्रिकेटर रेयान परागने ४३ धावांची शानदार खेळी केली. 

मुंबईविरुद्ध विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेले सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी चांगली सुरूवात करून दिली. ३.४ ओव्हरमध्ये राजस्थानने पहिला विकेट अजिंक्य रहाणेच्या रूपात गमावला. रहाणेने १२ धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनने स्टीव्ह स्मिथसोबत मिळून डाव पुढे नेला. दोघांनी संघाला ५० पार धावसंख्या करून दिली. मात्र आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सॅमसन बाद झाला. 

याआधी मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ५ बाद १६१ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने ४७ चेंडूत ६५ धावा फटकावल्या. तर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत ३४ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १५ चेंडूत २३ धावांची खेळी केली. यांच्या जोरावर मुंबईला १६१ धावा करता आल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने दोन विकेट घेतल्या तर आर्चर, उनदकट आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

या हंगामात राजस्थानचे पहिल्यांदा नेतृत्व करणाऱ्या स्मिथने ४८ धावांत नाबाद ५९ धावा केल्या. त्याला परागने चांगली साथ दिली. त्यामुळेच राजस्थानला हा विजय साकारता आला. दरम्यान, आतापर्यंत राजस्थानचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले होते. मात्र नेतृत्व बदल केल्याने राजस्थानने विजय साकारला अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: राजस्थानची मुंबईवर ५ विकेटनी मात Description: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. या सामन्यात राजस्थानचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने केले होते.
Loading...
Loading...
Loading...