IPL 2019: १० वर्ष जुना फोटो व्हायरल, विराट आणि स्टेन पाहा काय म्हणाले... 

IPL 2019
Updated Apr 22, 2019 | 20:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2019: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर चित्तथरारक विजय मिळवल्यानंतर आता विराट कोहली आणि डेन स्टेन यांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.

kohli and Steyn_ipl
विराट कोहली आणि डेल स्टेन: (फोटो - IPL Video grab)  

बंगळुरू: 'स्टेन गन' नावाने क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा आयपीएल २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळत आहे. आयपीएलच्या या मोसमात स्टेन संघालामध्ये अनेक सामन्यांनंतर आला. त्यामुळे तो आतापर्यंत फक्त दोनच सामने खेळू शकला आहे. स्टेन पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध शुक्रवारी खेळला. तर दुसरा सामना काल (रविवार) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला. या दोन्ही सामन्यात स्टेनने प्रत्येकी २-२ विकेट घेतले. स्टेनच्या आगमनामुळे बंगळुर संघात देखील आत्मविश्वास परतल्याचं दिसत आहे. 

स्टेनने रविवारी चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीवीर शेन वॉटसन आणि सुरेश रैना (०) या दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. चेन्नईविरुद्धचा हा सामना आरसीबीने फक्त १ रनने जिंकला. या विजयात स्टेनची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. कारण सुरुवातीलाच त्याने चेन्नईला दोन मोठे धक्के दिले होते. त्यामुळे चेन्नईचा डाव सुरुवातीलाच डळमळला होता. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी (नाबाद ८४) शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेला. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यानंतर आरसीबीच्या विजयानंतर विराटने जोरदार सेलिब्रेशन केलं. या विजयानंतर विराट कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला. या फोटोमध्ये २१ वर्षीय कोहली हा डेल स्टेनसोबत सेलिब्रेशन करताना दिसून येतो आहे. 

विराटचा हा व्हायरल फोटो २०१० सालचा आहे. जेव्हा स्टेन हा आरसीबी संघात होता. स्टेन हा २००८-१०मध्ये आरसीबीसाठी सलग तीन मोसमात खेळला होता. पण २०११ मध्ये त्याला डेक्कन चार्जर्सने आपल्या संघात घेतलं होतं. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनी त्याने आरसीबीमध्ये पुनरागमन केलं आहे. त्यामुळे व्हायरल झालेल्या या फोटोवर स्वत: कोहली आणि स्टेनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या आयपीएलमधील प्रवासालाही उजाळा दिला आहे.

कोहली म्हणाला की, 'टेन इअर चॅलेंजमुळे एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे जुन्या आठवणी पुन्हा तरळून गेल्या. दहा वर्षानंतर स्टेनसोबत सेलिब्रेशन करणं हा खूपच चांगला अनुभव आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की, आम्ही चिन्नास्वामीवर पुन्हा असं काही करु.' दुसरीकडे याच फोटोबाबत स्टेन असं म्हणाला की, 'या फोटोने जुन्या आठवणी ताज्या झाल्या.' यावेळी स्टेन असंही म्हणाला की, 'एक खेळाडू म्हणून कोहलीमध्ये जे बदल झाले आहेत त्याने मी खूपच प्रभावित झालो आहे.' 

पुढे स्टेन असंही म्हणाला की, 'या फोटोने काही चांगल्या आठवणी ताज्या झाल्या. या व्यक्ती (कोहली) मध्ये मोठा बदल झाला आहे. कोहली हा एक सर्वात चांगल्या खेळाडूंपैकी एक आहे. मी खरंच भाग्यवान आहे की, मी त्याला सुरुवातीपासून पाहत आलोय. एक १८ वर्षाचा खेळाडू म्हणून भेटणं आणि आता भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याला भेटणं ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: १० वर्ष जुना फोटो व्हायरल, विराट आणि स्टेन पाहा काय म्हणाले...  Description: IPL 2019: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर चित्तथरारक विजय मिळवल्यानंतर आता विराट कोहली आणि डेन स्टेन यांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.
Loading...
Loading...
Loading...