IPL 2019 मधील ५ भन्नाट विक्रम, जे पाहून आपणही व्हाल हैराण!

IPL 2019
Updated May 14, 2019 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2019: आयपीएल २०१९ मध्ये अनेक नवे विक्रम रचले गेले आहेत. काही विक्रम हे तर अगदीच अविश्वसनीय असेच आहे. अशाचा काही विक्रमांवर टाकूयात एक नजर: 

hardik_@mipaltan_twitter
hardik_@mipaltan  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०१९ चा अंतिम सामना अतिशय थरारक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना अतिशय नाट्यमयरित्या मुंबई इंडियन्सने जिंकला. चेन्नई सुपरकिंग्सवर अवघ्या १ रन्सने मात करत मुंबईने हा सामना जिंकला. याच विजयासोबत मुंबई आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ ठरला आहे. कारण आतापर्यंत मुंबईने तब्बल ४ वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. तर चेन्नई दुसऱ्या स्थानी आहे. कारण चेन्नईने ३ वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 

या संपूर्ण मोसमात अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले तर काही जुने विक्रम मोडीत निघाले. यावेळी काही खेळाडूंनी असे काही विक्रम रचले की जे खरोखरच अवर्णनीय असेच आहेत. आयपीएल १२ मधील अशाच काही जबरदस्त विक्रमांवर टाकूयात एक नजर: 

  1. हा असा पहिलाचा मोसम होता की, ज्यामध्ये संघांनी सर्वात जास्त वेळा आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये परदेशी खेळाडूंची संख्या घटवली. तब्बल १३ वेळा संघांनी ४ पेक्षा कमी परदेशी खेळाडूंना आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं. 
  2. किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या पूर्ण सीजनमध्ये संघात तब्बल ३२ बदल केले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, टीम मॅनेजमेंटचा आपल्या खेळाडूंवर नेमका किती विश्वास आहे. याशिवाय या सीजनमध्ये पंजाबनंतर सर्वात जास्त बदल हे दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये पाहायला मिळाले. दिल्लीच्या संघाने पूर्ण मोसमात २३ बदल केले. 
  3. आरसीबीचा प्रयास बर्मन हा सर्वात कमी वयाचा आयपीएलमध्ये पदार्पण करणारा खेळाडू ठरला. त्याने १६ वर्ष १५७ दिवसात आयपीएल संघात आपलं स्थान पक्कं केलं. याच दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान यानेही विक्रम रचला आहे. रियान हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सगळ्यात तरुण खेळाडू ठरला आहे. 
  4. चेन्नई सुपरकिंग्सच्या स्पिनर्सने या संपूर्ण मोसमात चांगली कामगिरी केली. चेन्नईच्या फिरकीपटूंनी एकूण ६२ बळी घेतले. आतापर्यंतच्या आयपीएल कोणत्याही मोसमापेक्षा या मोसमात एखाद्या संघाच्या  फिरकीपटूंनी सर्वाधिक बळी घेतले आहेत. यामध्ये इमरान ताहीर (२६ बळी), हरभजन सिंह (१६ बळी), रवींद्र जडेजा (१५ बळी) यांचा समावेश आहे. याशिवाय ताहीरने एक वेगळा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. एक फिरकीपटू म्हणून एका मोसमात जास्त बळी घेण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे. याआधी सुनील नारायण (२४ बळी) याच्या नावावर हा विक्रम होता. 
  5. मुंबई इंडियन्सच्या अल्जारी जोसेफ याने सर्वात शानदार पदार्पण केलं. त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १२ धावा देऊन ६ खेळाडूंना बाद केलं होतं. त्याने सोहेल तन्वीरचा देखील विक्रम मोडीत काढला आहे. सोहेलने आयपीएलमधील एका सामन्यात १४ धावा देत ६ बळी घेतले होते. त्याचा हा विक्रम बरीच वर्ष अबाधित होता. पण यंदाच्या मोसमात जोसेफने हा विक्रम मोडीत काढला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी