CSK vs KKR: चेन्नईचा कोलकातावर सहा विकेट्सने विजय

IPL 2020, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2020 मधील 49वी मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाली. 

CSK vs KKR
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, CSK vs KKR: आयपीएल 2020 (IPL 2020)मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच चेन्नई सुपर किंग्सने सहा विकेट्सने जिंकली आहे. ही मॅच खूपच चुरशीची झाली. शेवटच्या बॉलवर चेन्नईने कोलकातावर विजय मिळवला. 

कोलकाता नाईट रायडर्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला पहिला झटका लवकरच बसला तो म्हणजे शेन वॉट्सन आऊट झाल्याने. शेन वॉट्सन याने 19 बॉल्समध्ये 14 रन्स करत माघारी परतला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. मात्र नंतर अंबाती रायुडू हा सुद्धा आऊट झाला. अंबाती रायुडू याने 20 बॉल्समध्ये 38 रन्स केले. यानंतर आलेला महेंद्रसिंह धोनी हा अवघा एक रन करुन आऊट झाला. मग ऋतुराज गायकवाड हा सुद्धा आऊट झाला. ऋतुराज गायकवाड याने 53 बॉल्समध्ये 72 रन्स केले. मग रवींद्र जाडेजा याने 11 बॉल्समध्ये 31 रन्सची (नॉट आऊट) इनिंग खेळत टीमला विजय मिळवून दिला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमकडून पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. पॅठ कमिन्स याने चार ओव्हर्समध्ये 31 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती याने चार ओव्हर्समध्ये 20 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या.

पाहा CSK vs KKR मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

कोलकाताचं चेन्नई समोर 173 रन्सचं आव्हान

मॅच सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 172 रन्स केले आणि चेन्नई समोर विजयासाठी 173 रन्सचं आव्हान दिलं. कोलकाताच्या टीमकडून नितीश राणा याने 87 रन्सची दमदार इनिंग खेळली. शुभमन गिल याने 26 रन्स केले. दिनेश कार्तिकने नॉट आऊट राहत 21 रन्स केले. इऑन मॉर्गनने 15 रन्स, रिंकू सिंगने 11 रन्स केले. 

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमकडून लुंगी नगीडी याने दोन विकेट्स घेतल्या. तर मिशेल सॅन्टनर, रवींद्र जाडेजा आणि करन शर्मा या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी