DC vs CSK: चुरशीच्या सामन्यात दिल्लीचा चेन्नईवर विजय

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 17, 2020 | 23:36 IST

IPL 2020, Delhi Capitals vs Chennai Super Kings: आयपीएल 2020मधील 34वी मॅच दिल्ली कॅपिट्ल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाली. शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचलेली ही मॅच दिल्लीने जिंकली आहे.

DC vs CSK
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, DC vs CSK: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या टीम्समध्ये आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 34वी मॅच शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये झाली. ही मॅच दिल्ली कॅपिटल्सने पाच विकेट्सने जिंकली आहे. चेन्नईने दिलेलं आव्हान दिल्लीच्या टीमने 19.5 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत गाठलं आणि विजय मिळवला.

मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या टीमची सुरुवात खराब झाली. ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉ हा खातं उघडू शकलाच नाही आणि शून्यावर आऊट होत माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे अवघे आठ रन्स करुन आऊट झाला. दुसरीकडे शिखर धवन टीमला सावरत दमदार खेळी खेळली आणि टीमला विजय मिळवून दिला. 

शिखर धवनने नॉट आऊट राहत 58 बॉल्समध्ये 101 रन्सची दमदार इनिंग खेळली. आपल्या इनिंगमध्ये शिखर धवनने 14 फोर आणि एक सिक्सर लगावला श्रेयस अय्यरने 2 रन्स, मार्कस स्टॉयनिस याने 24 रन्स केले. या मॅचमध्ये शेवटी शिखर धवनला अक्षर पटेलने चांगली साथ दिली आणि टीमला विजय मिळवून दिला. अक्षर पटेल याने नॉट आऊट राहत पाच बॉल्समध्ये 21 केल्या.

आयपीएल 2020चं पॉईंट्स टेबल (IPL 2020 Points Table)

आयपीएल 2020च्या पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 14 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. 12 पॉईंट्ससह मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरूच्या टीमचे सुद्धा 12 पॉईंट्स आहेत. 

पाहा DC vs CSK मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

चेन्नईचे दिल्ली समोर 180 रन्सचं आव्हान

मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपरकिंग्सच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या टीमची सुरुवात खूपच खराब झाली. सॅम करन हा खातं न उघडताच माघारी परतला. यानंतर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉट्सन यांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. फाफ डु प्लेसिस याने 47 बॉल्समध्ये 58 रन्स केले. शेन वॉट्सनने 28 बॉल्समध्ये 36 रन्स केले. अंबाती रायुडू याने नॉट आऊट राहत 45 रन्स तर रवींद्र जाडेजा याने नॉट आऊट राहत 33 रन्स केले. चेन्नईच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावत 179 रन्स केले आणि दिल्लीसमोर विजयासाठी 180 रन्सचं आव्हान उभं केलं.

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून अनरिच नोर्जे याने दोन विकेट्स घेतल्या. अनरिच याने चार ओव्हर्समध्ये 44 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी