DC vs RR: चुरशीच्या लढतीत दिल्लीचा राजस्थानवर 13 रन्सने विजय

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 14, 2020 | 23:19 IST

IPL 2020, Delhi Capitals vs Rajasthan Royals: आयपीएल 2020 मधील 30वी मॅच दिल्ली कॅपिट्ल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये झाली. ही मॅच खूपच रंगतदार आणि चुरशीची झाली.

Rajasthan Royals vs Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्स (फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, DC vs RR: आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 30 मॅच दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाली आणि ही मॅच दिल्लीने जिंकली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेली ही मॅच खूपच रंगतदार झाली. दिल्लीच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत 148 रन्सपर्यंत मजल मारता आली. यामुळे ही मॅच दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानवर 13 रन्सने विजय मिळवला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या टीमची सुरूवात बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी केली. दोघेही टीमला सावरत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच बटलर 22 रन्सवर आऊट झाला. यानंतर आलेला स्टिव्ह स्मिथ अवघा एक रन करुन माघारी परतला. तर बेन स्टोक्सने 41 रन्स केले. त्यानंतर संजू सॅमसन आणि रॉबिन उथप्पा यांनी टीमला सावरत स्कोअर पुढे नेला. मात्र, सॅमसन 25 तर उथप्पा 32 रन्स करुन आऊट झाला.

दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल 

राजस्थान रॉयल्सच्या टीमला पराभूत करत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या खात्यात आणखी दोन पॉईंट्स जमा केले आहेत. यामुळे आता आयपीएल 2020च्या सीझनमधील पॉईंट्सटेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पाहा DC vs RR मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

दिल्लीचं राजस्थान समोर विजयासाठी 162 रन्सचं आव्हान

मॅचच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करणअयाचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 161 रन्स केले आणि राजस्थानला विजयासाठी 162 रन्सचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून शिखर धवनने सर्वाधिक म्हणजेच 57 रन्स केले. श्रेयस अय्यर याने 53 रन्स केले. मार्कस स्टॉयनिस याने 18 रन्स केले.

राजस्थान रॉयल्सच्या टीमकडून जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चरने चार ओव्हर्समध्ये 19 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. जयदेव उनाडकट याने तीन ओव्हर्समध्ये 32 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी