कोरोना संकटातही IPL 2020ने केली अशी कमाल की...

IPL 2020
Updated Dec 09, 2020 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना महामारीदरम्यान यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगने यशस्वीतेचे आणखी एक पाऊल गाठले आहे. २०२०मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला स्पोर्ट्स इव्हेंट ठरला आहे. 

ipl 2020
कोरोना संकटातही IPL 2020ने केली अशी कमाल की... 

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकटादरम्यान आयपीएलने मिळवले आणखी एक यश
  • ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये आयपीएलने कोरोना व्हायरसलाही सर्चमध्ये टाकले मागे
  • यूएफा चॅम्पियन्स लीग सर्वाधिक सर्च केला जाणारा स्पोर्ट्स इव्हेंट

मुंबई: भले जगात फुटबॉल(football) हा सर्वाधिक देशांमध्ये खेळला जाणारा आणि सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे मात्र कोरोनाच्या संकटकाळात(corona) क्रिकेटने(cricket) फुटबॉलवर(football) मात केली आहे. वास्तवात जरी क्रिकेट फुटबॉलला मात देण्यात अयशस्वी ठरला असला तरी जागतिक कोरोना संकटादरम्यान व्हर्चुअल वर्ल्डमध्ये हे घडले आहे. सर्व इव्हेंट्स पाहता आयपीलएल सर्व प्रकारच्या सर्चमध्ये अव्वल राहिला आहे. ज्या व्हायरसने संपूर्ण जगाला हलवून टाकले त्या कोरोना व्हायरसचेही आयपीएलसमोर काही चालले नाही आणि तोही ओव्हरऑलमध्ये कोरोना व्हायरसनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला.

गुगलकडू २०२०मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या शब्दांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. यात आयपीएल २०२० हा शब्द या वर्षात सर्वाधिक सर्च केला गेलेला इव्हेंट ठरला. यानंतर दुसऱ्या स्थानावर यूएफा चँपियन्स लीग आहे. 

हे आहेत गुगलमध्ये सर्च करण्यात आलेले टॉप टेन स्पोर्ट्स इव्हेंट्स

गुगलवर १० सर्वाधिक सर्च केले गेलेले स्पोर्ट्स इव्हेंट अनुक्रमे आयपीएल, यूएफा प्रीमीयर लीग,इंग्लिश प्रीमियर लीग, फ्रेंच ओपन, ला लीगा, सीरी ए, ऑस्ट्रेलियनओपन, एनबीए बास्केटबॉल, यूएफा युरोप लीग, यूएफा नेशन्स लीग. टॉप टेनमध्ये क्रिकेटमधील एक, टेनिसमधील दोन, बास्केटबॉलचा एक आणि सगळ्यात जास्त फुटबॉलचे ६ इव्हेंट आहेत. 

आयपीएल २०२०चे आयोजन कोरोना संकट काळात यूएईमध्ये करण्यात आले होते. याच्या प्रसारणाच्या पहिल्या सामन्याला रेकॉर्डब्रेक ओपनिंग मिळाली होती. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात आयपीएलमधील सर्वात पहिला सामना खेळवण्यात आला होता. हा सामना कोट्यावधी लोकांनी पाहिला होता. या सामन्याने व्ह्यूवरशिपचे नवे रेकॉर्ड केले होते. 

मुंबई इंडियन्सला खिताब

यंदाचा आयपीएल २०२०चा खिताब मुंबई इंडियन्सने पटकावला. यासोबत सर्वाधिक आयपीएलची विजेतेपदे मिळवणारा मुंबई इंडियन्स हा संघ ठरला आहे. त्यांचे हे पाचवे विजेतेपद आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलला हरवत हा खिताब मिळवला. मुंबई इंडियन्सने १८.४ ओव्हरमध्ये पाच बाद १५७ धावा करुन मॅच पाच विकेट राखून जिंकली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी