KXIP vs SRH: चुरशीच्या लढतीत पंजाबचा हैदराबादवर विजय

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 24, 2020 | 23:48 IST

IPL 2020, Sunrisers Hyderabad vs Kings XI Punjab: आयपीएल 2020 मधील 43वी मॅच सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात झाली. ही मॅच पंजाबने जिंकली आहे.

SRH vs KXIP
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, SRH vs KXIP: आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 43वी मॅच सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात झाली. ही मॅच किंग्स इलेवन पंजाबने 12 रन्सने जिंकली आहे. हैदराबादची टीम सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, पंजाबच्या बॉलर्ससमोर हैदराबादच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. हैदराबादच्या टीमकडून डेव्हिड वॉर्नर याने सर्वाधिक म्हणजेच 35 रन्स केले. हैदराबादची टीम 19.5 ओव्हर्समध्ये 114 रन्सवर ऑलआऊट झाली.

किंग्स इलेवन पंजाबने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या टीमकडून जॉनी बेयरस्टो 19 रन्स करुन तर डेव्हिड वॉर्नर याने 35 रन्स करुन माघारी परतला. मनिष पांडे हा टीमला सावरत असताना अब्दुल समद हा सात रन्स करुन आऊट झाला. मग विजय शंकर हा मनिष पांडेला चांगली साथ देत असतानाच मनिष पांडे 15 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर विजय शंकरही 26 रन्स करुन माघारी परतला. होल्डर पाच रन्स करुन तर राशिद खान शून्यावर आऊट झाला.

किंग्स इलेव्हन पंजाबकडून अर्षदीप सिंग आणि क्रिस जॉर्डन या दोघांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. अर्षदीप सिंग याने 3.5 ओव्हर्समध्ये 23 रन्स करत तीन विकेट्स घेतल्या. क्रिस जॉर्डन याने चार ओव्हर्समध्ये 17 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी, एम अश्विन आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

पाहा SRH vs KXIP मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

मॅचच्या सुरुवातीला सनरायजर्स बैदराबादच्या टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात उतरलेल्या किंग्स इलेवन पंजाबच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत अवघे 126 रन्स केले आणि हैदराबादसमोर विजयासाठी 127 रन्सचे आव्हान दिले. किंग्स इलेवन पंजाबच्या टीममधून एकाही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. 

निकोलस पूरन याने नॉट आऊट राहत 32 रन्स केले. केएल राहुल 27 रन्सवर आऊट झाला. मनदीप सिंग याने 17 रन्स केले. क्रिस गेल 20 रन्सवर आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल 12 रन्स, दीपक हुडा शून्य रन, क्रिस जॉर्डन सात रन्स तर एम अश्विन चार रन्सवर आऊट झाला. हैदराबादच्या टीमकडून संदीप शर्मा, जॅसन होल्डर आणि राशिद खान या तिघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी