मुंबई इंडियन्सचा १० विकेट राखून विजय

IPL 2020 Match 41 CSK vs MI Mumbai Indians won by 10 wickets चेन्नई सपुरकिंग्स विरुद्ध शानदार गोलंदाजी आणि फलंदाजी करुन मुंबई इंडियन्सने मॅच १० विकेट राखून जिंकली

IPL 2020 Match 41 CSK vs MI
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • चेन्नईने मुंबईला दिले ११५ धावांचे आव्हान
  • चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ९ बाद ११४ एवढी मजल मारली
  • मुंबई इंडियन्सचा १० विकेट राखून विजय

शारजा (Sharjah): चेन्नई सपुरकिंग्स विरुद्ध शानदार गोलंदाजी आणि फलंदाजी करुन मुंबई इंडियन्सने मॅच १० विकेट राखून जिंकली. मुंबई इंडियन्सचा ट्रेंट बोल्ट मॅन ऑफ द मॅच झाला.

चेन्नई सुपरकिंग्सने दिलेले ११५ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने तेराव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूत सजगत्या पूर्ण केले. मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामीवीरांनी छान फलंदाजी केली. 

इशान किशनने ३७ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला. इशानला क्विंटन डी कॉकने अनुभवाच्या जोरावर उत्तम साथ दिली. डी कॉकने ३७ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार हाणले.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच नंतर फलंदाजी करुनही मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा १० विकेट राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या या ऐतिहासिक विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये १४ पॉइंट्स आणि सर्वोत्तम नेट रनरेटसह त्यांनी पहिले स्थान पटकावले. उद्या पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला दुसऱ्या स्थानावरील दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. ही मॅच सुपर सॅटरर्डे असल्यामुळे दुपारी असेल. मॅच अबुधाबी येथे रंगणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये आता मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही टीमचे १४ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे १० पॉइंट्स आहेत. ते चौथ्या स्थानावर आहेत. सनरायजर्स हैदराबाद, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही टीमचे ८ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे सनरायजर्स हैदराबाद पाचव्या, किंग्स इलेव्हन पंजाब सहाव्या आणि राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स सहा पॉइंट्ससह शेवटच्या, आठव्या स्थानावर आहे.

ट्रेंट बोल्ट मॅन ऑफ द मॅच

मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने आजच्या मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजांना पुरते जखडून टाकले होते. त्याने ४ ओव्हरमध्ये १८ धावा देत ४ विकेट घेतल्या आणि १७ डॉट बॉल टाकले. ट्रेंट बोल्टने चेन्नई सुपरकिंग्सच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट माघारी पाठवले. ऋतुराजला भोपळाही फोडता आला नाही, तो पायचीत झाला तर फाफ डू प्लेसिस एक धाव करुन क्विंटन डी कॉकच्या हाती झेल देऊन परतला. रविंद्र जाजेडा ७ धावा केल्यानंतर बोल्टच्या चेंडूवर कृणाल पांड्याकडे झेल देऊन बाद झाला. चेन्नई सुपरकिंग्ससाठी सर्वाधिक ५२ धावा करणाऱ्या अर्धशतकवीर सॅम करणला ट्रेंट बोल्टने क्लीनबोल्ड अर्थात त्रिफळाचीत केले. बोल्टच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे चेन्नईला ११४ धावांपर्यंत मजल मारता आली.

चेन्नईने मुंबईला दिले ११५ धावांचे आव्हान

आयपीएलच्या ४१व्या लीग मॅचमध्ये चेन्नई सपुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ९ बाद ११४ एवढी मजल मारली. त्यांनी मुंबई इंडियन्सलला ११५ धावांचे आव्हान दिले. (IPL 2020 Match 41 CSK vs MI)

चेन्नई सुपरकिंग्स संघाची सुरुवात अडखळत झाली. ऋतुराज गायकवाड शून्यावर तर फाफ डू प्लेसिस १ धाव करुन बाद झाला. अंबाती रायुडू २ धावा करुन आणि नारायण जगदीसन शून्य धावा करुन बाद झाला. धोनी १६ तर रविंद्र जाडेजा ७ धावा करुन बाद झाला. सॅम करण ५२ धावा करुन बाद झाला. दीपक चहर शून्य धावा करुन तर शार्दुल ठाकूर ११ धावा करुन बाद झाला. इमरान ताहिर १३ धावा करुन नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंच बोल्टने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ४ ओव्हरमध्ये १८ धावा देत ४ विकेट घेतल्या. राहुल चहरने ४ ओव्हरमध्ये २२ धावा देऊन २ विकेट घेतल्या. तसेच जसप्रित बुमराहने ४ ओव्हरमध्ये २५ धावा देऊन २ विकेट घेतल्या. नॅथन कूल्टर नाईलने ४ ओव्हरमध्ये २५ धावा देऊन १ विकेट घेतली. कृणाल पांड्याने ३ ओव्हरमध्ये १६ तर कायरन पोलार्डने एक ओव्हर टाकून ४ धावा दिल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी