MI vs KXIP: डबल सुपर ओव्हरची धमाल, पंजाबची मुंबईवर मात

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 19, 2020 | 01:29 IST

IPL 2020, Mumbai Indians vs Kings XI Punjab: आयपीएल 2020 मधील 36वी मॅच मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाली. ही मॅच खूपच रंगतदार झाली. मॅच टाय झाल्याने सुपर ओव्हर झाली आणि ती सुद्धा टाय झाली.

KXIP
(फोटो सौजन्य: @lionsdenkxip BCCI, IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, MI vs KXIP: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) या टीम्समध्ये आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 36वी मॅच दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झाली. किंग्स इलेव्हन पंजाबने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत 176 रन्स केले त्यामुळे ही मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हर टाकण्यात आली. मात्र, ही सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली. त्यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली. या मॅचमध्ये पंजाबने विजय मिळवला.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून क्रिस जॉर्डने ओव्हर टाकली. मुंबई इंडियन्सकडून पोलार्ड आणि हार्दिक पांड्या हे बॅटिेगसाठी मैदानात उतरले. हार्दिक पांड्या आऊट झाल्यावर सूर्यकुमार बॅटिंगसाठी आला. मुंबईने सहा बॉल्समध्ये एक विकेट गमावत 11 रन्स केले. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबला विजय मिळवण्यासाठी सहा बॉल्समध्ये 12 रन्सची आवश्यकता होती. सुपर ओव्हरमध्ये ही मॅच किंग्स इलेव्हन पंजाबने जिंकली आहे. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट याने सुपर ओव्हर केली. तर पंजाबकडून क्रिस गेल आणि मयंक अग्रवाल मैदानात उतरले होते. दोघांनी चार बॉल्समध्येच विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सकडून दुसरी सुपर ओव्हर 

 1. पहिला बॉल - सिक्स (सहा रन्स)
 2. दुसरा बॉल - एक रन
 3. तिसरा बॉल - फोर (चार रन्स)
 4. चौथा बॉल - फोर (चार रन्स)

पंबाजची दुसरी सुपर ओव्हर 

 1. पहिला बॉल - एक रन 
 2. दुसरा बॉल - वाइड (एक रन)
  दुसरा बॉल - एक रन
 3. तिसरा बॉल - फोर (चार रन्स)
 4. चौथा बॉल - वाइड (एक रन)
  चौथा बॉल - एक रन, एक विकेट
 5. पाचवा बॉल - शून्य रन 
 6. सहावा बॉल - दोन रन्स

मुंबई इंडियन्सकडून बुमराहने सुपर ओव्हर केली. पंजाबकडून केएल राहुल आणि निकोलस पूरन मैदानात उतरले मात्र, पूरन आऊट झाला. यानंतर केएल राहुल आणि दीपक हुडा यांनी बॅटिंग केली. बुमराहच्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दोनन विकेट्स गमावत पाच रन्स केले.

बुमराहची सुपर ओव्हर...

 1. पहिला बॉल - एक रन 
 2. दुसरा बॉल - विकेट 
 3. तिसरा बॉल - एक रन
 4. चौथा बॉल - एक रन 
 5. पाचवा बॉल - विकेट 
 6. सहावा बॉल - विकेट

पंजाबकडून मोहम्मद शमीने सुपर ओव्हर केली. मुंबईकडून क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा यांनी बॅटिंग केली. या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने सुद्धा पाच रन्स केले.

मोहम्मद शमीची सुपर ओव्हर

 1. पहिला बॉल - एक रन 
 2. दुसरा बॉल - एक रन 
 3. तिसरा बॉल - एक रन
 4. चौथा बॉल - शून्य रन
 5. पाचवा बॉल - एक रन
 6. सहावा बॉल - एक रन आणि विकेट

सुपर ओव्हरपूर्वी मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीमला मयांक अग्रवाल याच्या रुपात पहिला धक्का बसला. मयांक अग्रवाल 11 रन्स करुन आऊट झाला. मात्र, केएल राहुल हा टीमला सावरत रन्स बनवत होता. केएल राहुलने 51 बॉल्समध्ये 77 रन्स केले. क्रिस गेल याने 24 रन्स, निकोलस पूरन याने 24 रन्स केले. तर ग्लेन मॅक्सवेल शून्यावर आऊट झाला.

पाहा MI vs KXIP मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

मुंबईचं किंग्स इलेव्हन पंबाजसमोर 177 रन्सचं आव्हान

मॅचच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय़ घेतला. मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा अवघे नऊ रन्स करुन आऊट झाला.  सूर्यकुमार यादव शून्य रन्स करुन माघारी परतला. क्विंटन डी-कॉक याने 53 रन्स केले तर कृणाल पांड्या याने 34 रन्स केले. मुंबईने 20 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत 176 रन्स केले आणि पंबाज समोर विजयासाठी 177 रन्सचं आव्हान दिलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी