IPL 2020: मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा आयपीएलमधून बाहेर, 'या' बॉलरला मिळाली संधी

Lasith Malinga: आयपीएल 2020 साठी मुंबई इंडियन्स टीममधून लसिथ मलिंगा बाहेर झाला आहे. लसिथ मलिंगा टीम मधून बाहेर गेल्याने मुंबई इंडियन्ससाठी हा एक झटका असल्याचं बोललं जात आहे. 

Lasith Malinga
लसिथ मलिंगा (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई : आयपीएलचा 13 (IPL 13) सीजन सुरू होण्यापूर्वीच अनेक प्लेअर्स हे स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्याजागी नवीन प्लेअर्सला टीममध्ये संधी दिली जात आहे. आता मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) यंदाच्या आयपीएलमधून बाहेर झाला आहे. लसिथ मलिंगा याने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले असून त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर जेम्स पॅटीन्सन (Australian Fast Bowler James Pattinson) याला संधी देण्यात आली आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने बुधवारी जाहीर केले की, ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर जेम्स पॅटीन्सन याला लसिथ मलिंगाच्या ऐवजी टीममध्ये संधी देण्यात आली आहे. श्रीलंकन क्रिकेट टीमचा लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या टीमचा एक दिग्गज प्लेअर आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमधून वैयक्तीक कारणास्तव लसिथ मलिंगा याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. 

मुंबई इंडियन्सच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, "लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या आयपीएलमधून बाहेर राहण्याची विनंती केली आहे आणि श्रीलंकेत आपल्या कुटुंबासमवेत राहण्याची त्याची इच्छा आहे". आता जेम्स पॅटीन्सन या आठवड्याच्या शेवटपर्यंत मुंबई इंडियन्स टीमसोबत जोडला जाईल.

लसिथ मलिंगा याने आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. मुंबई इंडियन्स टीमचे मालक आकाश अंबानीने यांनी जेम्स पॅटीन्सनचं स्वागत करत म्हटलं, जेम्स आमच्यासोबत फिट होण्यासाठी योग्य प्लेअर आहे आणि आमच्यासाठी फास्ट बॉलर्सपैकी एक असेल. लसिथ मलिंगाची कमी आम्हाला जाणवेल.

IPL 2020 साठी मुंबई इंडियन्सची टीम

आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरेन पोलॉर्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स पॅटीन्सन, मिचेल मॅक्लेघन, क्विटन डी कॉक, राहुल चहर, रोहित शर्मा, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, नाथन क्लूटर नाइल, सौरभ तिवारी, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय सिंह.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी