MI vs DC: दिल्लीचा धुव्वा उडवत मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये एन्ट्री

IPL 2020
सुनिल देसले
Updated Nov 06, 2020 | 17:36 IST

IPL 2020, Mumbai Indians vs Delhi Capitals: आयपीएल 2020च्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्लीचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. 

Mumbai Indians
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुंबई इंडियन्सची आयपीएल 2020च्या फायनलमध्ये धडक
  • आयपीएल 2020च्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय
  • मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 57 रन्सने विजय

IPL 2020 qualifier 1, MI vs DC: आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात पहिली क्वॉलिफायर (IPL 2020 qualifier 1) मॅच झाली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 57 रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या फायनल (Mumbai Indians qualify for IPL 2020 final)मध्ये धडक मारली आहे.

मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची चांगलीच दमछाक झाल्याचं पहायला मिळालं. मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सने दिल्लीच्या बॅट्समनला एकामागेएक आऊट करत त्यांच्यावर दबाव बनवून ठेवला आणि ही मॅच अगदी सहज जिंकली. दिल्लीच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत अवघ्या 143 रन्सपर्यंत मजल मारता आली. यामुळे मुंबईने ही मॅच 57 रन्सने जिंकली आहे.

मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सची कमाल

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक म्हणजेच चार विकेट्स घेतल्या. बुमराहने चार ओव्हर्समध्ये 14 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट याने दोन ओव्हर्समध्ये दोन विकेट्स घेतल्या. तर कृणाल पांड्या आणि किरेन पोलार्ड या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

दिल्लीचे चार बॅट्समन शून्यावर आऊट

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमची सुरुवातच खूप खराब झाली. पहिले तीन बॅट्समन खाते न उघडताच माघारी परतले. यामध्ये पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. तर डॅनिएल सॅम्स हा सुद्धा शून्यावर आऊट झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून मार्कस स्टॉयनिस याने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, तो 65 रन्सवर आऊट झाला. तर अक्षर पटेल यानेही 42 रन्स केले. या दोघांव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून कोणत्याही बॅट्समनला चांगला स्कोअर करता आला नाही.  

मुंबईने दिले होते 201 रन्सचे आव्हान

मॅचच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत 200 रन्स केले आणि दिल्ली कॅपिट्स समोर विजयासाठी 201 रन्सचे आव्हान उभे केले. मुंबई इंडियन्सच्या टीमकडून इशान किशन याने नॉट आऊट 55 रन्सची इनिंग खेळली. सूर्यकुमार यादव याने 51 रन्स केले. क्विंटन डी-कॉक याने 40 रन्स केले. तर हार्दिक पांड्या यानेही 37 नॉट आऊट रन्सची इनिंग खेळली.

दिल्ली कॅपिटल्स कडून आर अश्विन याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने चार ओव्हर्समध्ये 29 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर एनरिच नॉर्टजे आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी