RCB vs KKR: बंगळुरूचा कोलकातावर मोठा विजय

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 21, 2020 | 22:41 IST

IPL 2020, Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2020मधील 39वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच बंगळुरूने सहज जिंकली आहे. 

RCB
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या टीम्समध्ये आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 39वी मॅच झाली. ही मॅच बंगळुरूने अगदी सहज जिंकली आहे. टॉस जिंकून मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाताच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये अवघे 84 रन्स करता आले. कोलकाताने दिलेलं आव्हान बंगळुरूच्या टीमने 8 विकेट्स राखून गाठलं आणि विजय मिळवला. बंगळुरूने हे आव्हान 13.3 ओव्हर्समध्ये गाठलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमकडून देवदत्त पड्डीकल आणि अॅरोन फिंच यांनी सुरुवात केली. अॅरोन फिंच 16 रन्स करुन आऊट झाला तर देवदत्त पड्डीकल याने 17 बॉल्समध्ये 25 रन्स केले. यानंतर गुरकीरत मन सिंग आणि विराट कोहली यांनी टीमला विजय मिळवून दिला. गुरकीरत याने नॉट आऊट राहत 26 बॉल्समध्ये 21 रन्स केले तर विराट कोहली याने नॉट आऊट राहत 17 बॉल्समध्ये 18 रन्स केले.

पॉईंट्स टेबलमध्ये झाले बदल 

कोकाता नाईट रायडर्सचा पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम आयपीएल 2020 सीझनमधील पॉईंट्सटेबलमध्ये आता दुसऱ्या क्रमांकावर दाखल झाली आहे. तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीने 10 मॅचेस खेळत आपल्या खात्यात 14 पॉईंट्स मिळवले आहेत. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 मॅचेस खेळत 14 पॉईंट्स मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सने 9 मॅचेसमध्ये 12 पॉईंट्स मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.

पाहा RCB vs KKR मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

कोलकाताचं बंगळुरू समोर अवघ्या 85 रन्सचं आव्हान 

मॅचच्या सुरुवातीला टॉस जिंकत कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोलकाताच्या टीमला चांगला स्कोअर उभा करण्यात अपयश आलं. कोलकाताने 20 ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत केवळ 84 रन्स केले आणि बंगळुरू समोर विजयासाठी 85 रन्सचं आव्हान उभं केलं. पाहूयात कोलकाताच्या टीमकडून कोणी किती रन्स केले.

  1. शुभमन गिल - 1 रन
  2. राहुल त्रिपाठी - 1 रन
  3. नितीश राणा - 0 रन
  4. टॉम बॅन्टन - 10 रन्स 
  5. दिनेश कार्तिक - 4 रन्स 
  6. पॅट कमिन्स - 4 रन्स 
  7. इऑन मॉर्गन - 30 रन्स 
  8. कुलदीप यादव - 12 रन्स 
  9. ल्यूक फर्ग्युसन - नॉट आऊट 19 रन्स 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या आहे. मोहम्मद सिराज याने चार ओव्हर्समध्ये 8 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहल याने दोन विकेट्स तर नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी