RCB vs KXIP: शेवटच्या बॉलवर पंजाबचा बलाढ्य बंगळुरूवर 8 विकेट्सने विजय

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 16, 2020 | 00:16 IST

IPL 2020, Royal Challengers Bangalore vs Kings XI Punjab: आयपीएल 2020 मधील 31 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाली. 

KXIP
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, RCB vs KXIP: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 31वी मॅच शाहजाह क्रिकेट स्टेडियममध्ये झाली. ही मॅच किंग्स इलेव्हन पंजाबने 8 विकेट्सने जिंकली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबने एक विकेट गमावत विजय मिळवला आहे. पंबाजच्या टीमची सुरूवात सुद्धा खूप चांगली झाली. ओपनिंगला आलेल्या के.एल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. मयांक अग्रवाल 45 रन्स करुन आऊट झाला. यानंतर केएल राहुल आणि क्रिस गेल यांनी टीमला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. केएल राहुल याने नॉट आऊट राहत 49 बॉल्समध्ये 61 रन्सची खेळी खेळली. क्रिस गेल 53 रन्सवर आऊट झाला. तर निकोलस पूरन याने नॉट आऊट राहत सहा रन्स केले. 

बंगळुरूच्या टीमकडून युजवेंद्र चहल याने एक विकेट घेतली. युजवेंद्र चहल याने तीन ओव्हर्समध्ये 35 रन्स देत एक विकेट घेतली. तर क्रिस मॉरिस, नवदीप सैनी, इसुरू उदाना, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही विकेट घेता आली नाही. क्रिस गेल याला देवदत्त पड्डीकल याने रन आऊट केले.

पाहा RCB vs KXIP मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

बंगळुरूचं पंजाबसमोर 172 रन्सचं आव्हान

मॅचच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत 171 रन्स केले आणि पंजाबसमोर विजयासाठी 172 रन्सचं आव्हान उभं केलं. बंगळुरूच्या टीमकडून विराट कोहली याने सर्वाधिक म्हणजेच 48 रन्स केले. क्रिस मॉरिस याने 25 रन्स, शिवम दुबेने 23 रन्स, अॅरोन फिंच याने 20 रन्स, देवदत्ता पड्डीकल याने 18 रन्स, वॉशिंग्टन सुंदर याने 13 रन्स केले.

पंजाबच्या टीमकडून मोहम्मद शमी आणि मुरुगन अश्विन या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले. मोहम्मद शमी याने चार ओव्हर्समध्ये 45 रन्स देत दोन विकेट घेतले. एम. अश्विन याने चार ओव्हर्समध्ये 23 रन्स देत दोन विकेट्स घेतले. तर क्रिस जॉर्डन आणि अर्षदीप सिंग या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी