RCBvsMI: मुंबई इंडियन्सचा 'सूर्य' तळपला, बंगळुरूचा पराभव करुन मुंबईची प्ले ऑफमध्ये एन्ट्री

IPL 2020, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: आयपीएल 2020 मधील 48वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाली. ही मॅच जिंकत मुंबईने प्ले ऑफमध्ये एन्ट्री केली आहे. 

RCB vs MI
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, RCB vs MI: आयपीएल 2020 (IPL 2020)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेली मॅच मुंबईने जिंकली आहे. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव याने दमदार इनिंग खेळत टीमला विजय मिळवून दिला आहे. बंगळुरूने दिलेलं आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत गाठलं. यंदाच्या आयपीएल सीझनमधील प्लेऑफमध्ये दाखल होणार मुंबई इंडियन्स पहिली टीम ठरली आहे.

मुंबई इंडियन्सच्या टीमकडून सूर्यकुमार यादव याने नॉट आऊट राहत 43 बॉल्समध्ये 79 रन्सची दमदार इनिंग खेळली. यामध्ये सूर्यकुमार यादव याने 10 फोर आणि तीन सिक्सर लगावले आहेत. क्विंटन डी-कॉक याने 18 रन्स केले. इशान किशन याने 25 रन्स, सौरभ तिवारी याने पाच रन्स केले. कृणाल पांड्याने 10 रन्स तर हार्दिक पांड्याने 17 रन्स केले. बंगळुरूच्या टीमकडून युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या तर क्रिस मॉरिस याने एक विकेट घेतली.

आयपीएल 2020 पॉईंट्स टेबल (IPL 2020 Points Table)

  1. मुंबई इंडियन्स - 16 पॉईंट्स
  2. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 14 पॉईंट्स 
  3. दिल्ली कॅपिटल्स - 14 पॉईंट्स 
  4. किंग्स इलेव्हन पंजाब - 12 पॉईंट्स 
  5. कोलकाता नाईट रायडर्स - 12 पॉईंट्स 

पाहा RCB vs MI मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

बंगळुरूने मुंबईला दिलेलं 165 रन्सचं आव्हान 

मॅचच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत 164 रन्स करत मुंबई समोर विजयासाठी 165 रन्सचं आव्हान दिलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमकडून देवदत्त पड्डीकल याने सर्वाधिक म्हणजेच 74 रन्स केले. जोशुआ फिलिप याने 33 रन्स, एबी डिव्हिलियर्सने 15 रन्स, गुरकीरत मान सिंग याने नॉट आऊट राहत 11 रन्स, वॉशिंग्टन सुंदरने नॉट आऊट राहत 10 रन्स केले.

मुंबई इंडियन्सच्या टीममधून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. बुमराहने चार ओव्हर्समध्ये 14 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, पोलार्ड या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी