RR vs MI: बेन स्टोक्सची जबरदस्त खेळी, राजस्थानचा मुंबईवर 8 विकेट्सने विजय

IPL 2020
सुनिल देसले
Updated Oct 25, 2020 | 23:13 IST

IPL 2020, Rajasthan Royals vs Mumbai Indians: आयपीएल 2020 मधील 45वी मॅच राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाली असून ही मॅच राजस्थानने जिंकली आहे.

RR vs MI
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, RR vs MI: आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 45 वी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाली. ही मॅच राजस्थान रॉयल्सने जिंकली आहे. राजस्थान रॉयल्सने दोन विकेट्स गमावत मॅच जिंकली आहे. 

मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरेल्या राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पा अवघ्या 13 रन्सवर माघारी परतला. तर स्टिव्ह स्मिथ 11 रन्स करुन आऊट झाला. बेन स्टोक्स याने टीमला सावरलं. बेन स्टोक्सला संजू सॅमसन याने चांगली साथ दिली. स्टिव्ह स्मिथ याने सेंच्युरी करत टीमला विजय मिळवून दिला. बेन स्टोक्स याने नॉट आऊट राहत 60 बॉल्समध्ये 107 रन्स केले. तर संजू सॅमसन याने नॉट आऊट राहत 31 बॉल्समध्ये 54 रन्स केले. मुंबई इंडियन्सकडून जेम्स पॅटिन्सन याने दोन विकेट्स घेतल्या.

पाहा RR vs MI मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

मॅचच्या सुरुवातील मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत 195 रन्स केले आणि राजस्थानसमोर विजयासाठी 196 रनसचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सकडून सहाव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्या याने नॉट राऊट राहत 60 रन्सची इनिंग खेळली. सूर्यकुमार यादव याने 40 रन्स केले. इशान किशन याने 37 रन्स, सौरभ तिवारीने 34 रन्स केले. क्विंटन डी-कॉक सहा रन्स आणि पोलार्ड यानेही सहा रन्स केले. 

राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याने चार ओव्हर्समध्ये 31 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. श्रेयस गोपाळ याने चार ओव्हर्समध्ये 30 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी याने एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी