रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय

IPL 2020 RR vs RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली.

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 
थोडं पण कामाचं
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७८ धावांचे आव्हान
  • राजस्थान रॉयल्स २० ओव्हरमध्ये ६ बाद १७७ धावा
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय

दुबई (Dubai): रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सने दिलेले १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट गमावून १९.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डीविलिअर्सने २२ चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या.  सलामीवीरी देवदत्त पडिक्कलने ३५ आणि अॅरॉन फिंचने १४ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने ४३ धावा केल्या. 

डीविलिअर्सने नाबाद ५५ आणि गुरकीरत मानसिंहने नाबाद १९ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.तेवतियाने देवदत्त पडिक्कलला तर कार्तिक त्यागीने कर्णधार कोहलीला बाद केले. श्रेयस गोपालने अरॉन फिंचला बाद केले.

राजस्थान रॉयल्स २० ओव्हरमध्ये ६ बाद १७७ धावा

राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७८ धावांचे आव्हान ठेवले आहे. टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने २० ओव्हरमध्ये ६ बाद १७७ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार यांच्या जोरावर ५७ धावा केल्या. सलामीवीर रॉबिन उथप्पाने २२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार यांच्या जोरावर ४१ धावा केल्या. बेन स्टोक्स १५ धावा करुन बाद झाला. संजू सॅमसन नऊ धावा करुन परतला. जोस बटलर २४ धावा करुन बाद झाला. जोफ्रा आर्चर २ धावा करुन बाद झाला. राहुल तेवतिया १९ धावा करुन नाबाद राहिला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ख्रिस मोरिसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याने ४ ओव्हरमध्ये २६ धावा देत सलामीवीर बेन स्टोक्स, अर्धशतकवीर स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांना बाद केले. युजवेंद्र चहलने सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन या दोघांना बाद केले.

पॉइंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर

राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच सात विकेट राखून जिंकल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीेएलच्या ३३ मॅच नंतर मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी १२ गुण झाले आहेत. रन रेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांचे प्रत्येकी ६ गुण आहेत. रन रेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद पाचव्या, चेन्नई सुपरकिंग्स सहाव्या आणि राजस्थान रॉयल्स सातव्या  स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाब चार गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तळाच्या आठव्या स्थानावर आहे. 

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स

पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि सहाव्या स्थानावरील चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात शारजामध्ये मॅच थोड्याच वेळात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी