RR vs SRH: हैदराबादचा राजस्थानवर आठ विकेट्सने विजय

IPL 2020, Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2020 मधील 40वी मॅच राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाली. ही मॅच हैदराबादने जिंकली आहे. 

Sunrisers Hyderabad
(फोटो सौजन्य: BCCI, @IPL Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter

Indian Premier League 2020, RR vs SRH: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीम्समध्ये आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 40वी मॅच झाली. ही मॅच सनरायजर्स हैदराबादने आठ विकेट्सने जिंकली आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या टीमने दोन विकेट्स गमावत 18.1 ओव्हर्समध्येच 156 रन्स केले आणि विजय मिळवला.

सनरायजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर अवघ्या चार रन्सवर आऊट झाला तर जॉनी बेयरस्टो हा 10 रन्स करुन माघारी परतला. मात्र, त्यानंतर आलेल्या मनिष पांडे आणि विजय शंकर या दोघांनी तुफानी बॅटिंग करत टीमला विजय मिळवून दिला. मनिष पांडे याने नॉट आऊट राहत 47 बॉल्समध्ये 83 रन्स केले. विजय शंकर याने नॉट आऊट राहत 51 बॉल्समध्ये 52 रन्स केले. 

राजस्थान रॉयल्सच्या टीमकडून जोफ्रा आर्चर याने दोन्ही विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याने चार ओव्हर्समध्ये 21 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याच्याशिवाय राजस्थानच्या एकाही बॉलरला विकेट घेता आली नाही.

आयपीएल 2020चे पॉईंट्स टेबल (IPL 2020 Points Table)

राजस्थान रॉयल्सचा पराभव करत सनराजर्स हैदराबादच्या खात्यात आणखी दोन पॉईंट्स वाढले आहेत. यामुळे हैदराबादची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर दाखल झाली आहे. आयपीएल 2020 सीझनमधील पॉईंट्स टेबलमध्ये 14 पॉईंट्ससह दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यातही 14 पॉईंट्स आहेत. 12 पॉईंट्ससह मुंबई इंडियन्स तिसऱ्या तर 10 पॉईंट्ससह कोलकाता चौथ्या स्थानावर आहे.

पाहा RR vs SRH मॅचचे संपूर्ण स्कोअरकार्ड (Scorecard)

मॅचच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या टीमने सहा विकेटस गमावत 154 रन्स केले आणि सनरायजर्स हैदराबदासमोर विजयासाठी 155 रन्सचं आव्हान उभं केलं. 

राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन याने 36 रन्स, बेन स्टोक्स याने 30 रन्स, रॉबिन उथप्पा याने 19 रन्स, रियान पराग याने 20 रन्स, स्टिव्ह स्मिथ याने 19 रन्स, जॉस बटलरने नऊ रन्स केले. सनरायजर्स हैदराबादच्या टीमकडून जेसन होल्डर याने तीन विकेट्स घेतल्या. त्याने चार ओव्हर्समध्ये 33 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. विजय शंकर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी