IPLच्या स्टार खेळाडूचा अक्षय कुमारला टोला, 'मी पैशांसाठी पगडी बांधत नाही'

सध्या आयपीएल २०२१चा धमाका सुरू आहे. अशात किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू हरप्रीत ब्रारनं अक्षय कुमारशी स्वतःची तुलना झाल्यानंतर अक्षयवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.

ipl 2021 cricketer harpreet brar criticize akshay kumar on social media
IPLच्या स्टार खेळाडूचा अक्षय कुमारला टोला  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • क्रिकेटर हरप्रीत ब्रारचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत
  • किंग्ज इलेव्हन पंजाबच्या स्टार क्रिकेटरचा अक्षय कुमारला टोला
  • पैशासाठी पगडी घालत नाही असं म्हणत हरप्रीत ब्रारनं अक्षयवर साधला निशाणा

मुंबई: काही महिन्यांपूर्वी देशात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटले होते. अगदी जागतिक स्तरावर याची दखल घेण्यात आली होती. पण या आंदोलनाबाबत बॉलिवुडकर आणि क्रिकेटर यांच्या भूमिकेवरून बरेच वाद झाले. अशात आता आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू हरप्रीत ब्रार यानं अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधत त्याच्यावर टीका केली आहे. एका चाहत्यानं हरप्रीतची तुलना अक्षयशी केल्यानंतर त्यानं आपण पैशांसाठी पगडी घालत नसल्याचं म्हणत अक्षय कुमारला टोला लगावला आहे.

हरप्रीतने आयपीएल २०२१ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या सामन्यात तुफान फलंदाजी आणि गोलंदाजी केली. यानंतर तो आयपीएलचा स्टार खेळाडू झाला आहे. अशा वेळी एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर त्याला मेसेज करत 'तू सिंग इज ब्लिंगमधल्या अक्षय कुमारसारखा दिसतोस असं म्हटलं होतं.' यावर हरप्रीतनं त्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये 'मी पैशांसाठी पगडी घालत नाही' असं म्हटलं आहे. यासोबतच त्या #ISupportFarmers असा हॅशटॅगही वापरला आहे. अर्थात याचा थेट रोख अक्षय कुमारच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेविषयी आहे हे स्पष्ट आहे.

क्रिकेटर हरप्रीत ब्रार पगडी घालण्याबाबत अभिमान बाळगत असल्याचे त्याच्या सोशल मीडियावरून दिसून येतं. पंजाबमधील मोगा भागातील २५ वर्षीय हरप्रीत ब्रारनं आपल्या अष्टपैलू खेळाने पंजाबला विजय मिळवून दिलाय. त्यानंतर त्याचा आयपीएलच्या स्टार खेळाडूंच्या यादीत समावेश झालाय. हरप्रीतचे ट्विटर अकाऊंट पाहिले तर लक्षात येतं की हरप्रीत शेतकरी प्रश्नांवर नेहमीच जाहीर भूमिका घेत आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही त्याचा सहभाग घेतला होता.

यापूर्वी ेशेतकरी आंदोलनावरून अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता दलजित दोसांज यांच्या ट्विटर युद्ध सुरू झाले होते. कंगना हिने सरकारची बाजू घेतली होती तर दलजित दोसांज याने शेतकऱ्यांची बाजू घेतली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी