IPL 2021 KKR vs DC: Prithvi Shaw च्या शानदार फॉर्ममागे या व्यक्तीचा हात? 

IPL 2021
प्रशांत जाधव
Updated Apr 30, 2021 | 14:01 IST

Prithvi Shaw । दिल्ली कॅपिटल्सचा  (Delhi Capitals)सलामीवीर पृथ्वी शॉने  (Prithvi Shaw)कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध स (Kolkata Knight Riders) अवघ्या 41 चेंडूंत 82 धावांची खेळी साकारली.

ipl 2021 kkr vs dc prithvi shaw father is behind his current form know details
Prithvi Shaw च्या शानदार फॉर्ममागे या व्यक्तीचा हात?  

थोडं पण कामाचं

  • कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये (KKR vs DC)दरम्यान झालेल्या सामन्यात  युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने चांगला जलवा दाखविला.
  • दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अवघ्या 41 चेंडूंत 82 धावांची खेळी केली.
  • 'सामनावीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये (KKR vs DC)दरम्यान झालेल्या सामन्यात  युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने चांगला जलवा दाखविला. या शानदार खेळीनंतर सामना एकतर्फी केला आणि दिल्लीला 7 गडी राखून जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पृथ्वीची वादळी खेळी

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अवघ्या 41 चेंडूंत 82 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 11 चौकार आणि 3 चौकार ठोकले आणि त्याचा स्ट्राइक रेट 200 होता.  त्याला 'सामनावीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवमच्या गोलंदाजी माहिती होती पृथ्वीला 

पृथ्वी शॉ सामन्यानंतर म्हणाला, 'मी काही विचार करत नव्हतो. फक्त लूज बॉलची वाट पाहत होतो. शिवम (मावी) मला कुठे गोलंदाजी करेल हे मला माहित होतं, आम्ही कनिष्ठ पातळीवर 4-5 वर्षे एकत्र खेळलो आहे. जेव्हा मला असे वाटते की मी फॉर्ममध्ये आहे, तेव्हा मी धावांचा विचार करीत नाही. मी माझ्याबद्दलही विचार करत नाही, फक्त संघ कसा जिंकेल असा हेतू मनात ठेवतो. 

वाईट काळात वडिलांनी साथ दिली

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघातून वगळल्यानंतर घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ म्हणाला, त्यावेळी माझ्या वडिलांनी मला खूप आधार दिला. ते म्हणाले तू तुझा नैसर्गिक खेळ दाखवत रहा. मी खूप कष्ट केले आणि क्रिकेटमध्ये चढ-उतार येतच असतात, '' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी