IPL 2021: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू आहे डेथ षटकांचा सर्वक्षेष्ठ गोलंदाज

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 18, 2021 | 15:04 IST

आयीपीएल २०२१ - इंडियन प्रीमियर च्या १४ व्या हंगामातील शनिवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये जबदस्त सामना रंगला होता.

IPL 2021: Mumbai Indians 'this' is the best bowler in death overs 18
IPL 2021: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू आहे डेथ षटकांचा सर्वक्षेष्ठ गोलंदाज  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • चार षटकात बुमराहाने दिल्या १४ धावा
  • १५० धावांचे आव्हान हैदराबादसाठी ठरलं अवघड
  • बोल्टने जसप्रीत बुमराहचं केलं कौतुक

मुंबई : आयीपीएल  २०२१ - इंडियन प्रीमियर च्या १४ व्या हंगामातील शनिवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये जबदस्त सामना रंगला होता. मुंबई इंडियन्सने १३ धावांनी हा सामना जिंकला असून सनरायझर्स हैदराबादला सलग दुसरा पराभव स्विकारावा लागला. दरम्यान मुंबईच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रतिस्पर्धी संघासमोर मोजक्या १५० धावांचं आव्हान दिलं होतं, पण गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे हैदराबादसाठी हे आव्हान मात्र मोठं झालं.

बुमराह आहे डेथ षटकारातील उत्कृष्ट गोलंदाज

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबई इंडियन्सचा खेळाडू बोल्टने बुमराहाच्या गोलंदाजंच कौतुक केलं आणि म्हणाला की, 'भारतीय जलद गोलंदाजाने या सामन्यातील डेथ षटकांचा सर्वक्षेष्ठ गोलंदाज आहे. बुमराह सारख्या खेळाडूला गोलंदाजी करताना पाहणं खूप भारी असतं.'

बुमराहने आपल्या चार षटकाच्या कोट्यातून फक्त १४ धावा दिल्या. तर एक गडी बाद केला. मुंबई इंडियन्सने शनिवारी सनरायझर्स हैदराबादला १५१ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ फक्त १३७ धावांमध्ये गारद झाला.

बोल्ट ने घेतले तीन विकेट


मुंबई इंडियंस की टीम में बोल्ट और बुमराह की जोड़ी शानदार प्रदर्शन करती है. दोनों ने पिछले चरण में बेहतरीन प्रदर्शन कर अपनी टीम को पांचवां खिताब दिलाने में मदद की थी. बोल्ट ने कहा, ''लेकिन मेरा व्यक्तिगत रूप से मानना है कि डेथ ओवरों में वह दुनिया के सर्वश्रेष्ठ गेंदबाजों में से एक है. वह मेरा काम काफी आसान बना देता है.''
मुंबई इंडियन्सच्या संघातील बोल्ट आणि बुमराहच्या जोडीने जोरदार गोलंदाजी केली. मागील सत्रात पण या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. बोल्ट म्हणला की, माझं व्यक्तिगतपणे असं वाटतं की, डेथ षटकांमध्ये तो सर्वक्षेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान फिरकी गोलंदाज राहुल चहरने १९ धावा देऊन तीन विकेट घेतले. तर बोल्टने २८ धावा देत हैदराबादचे ३ फलंदाजांना बाद केलं. मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून तीन सामन्यांमध्ये दुसरा विजय मिळवला. तर या विजयासह मुंबई पाईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी पोहचला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी