IPL Points Table 2021: चार सामन्यांनंतर दिल्ली टॉपवर, चेन्नई पिछाडीवर, जाणून घ्या इतर संघांची स्थिती 

IPL 2021
प्रशांत जाधव
Updated Apr 13, 2021 | 17:29 IST

IPL Points Table 2021 : आयपीएल 2021 मध्ये चार सामन्यांनंतर दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले आहेत.  

ipl 2021 points table team know team standing after the fourth match of the tournament
IPL Points Table 2021 : चार सामन्यांनंतर दिल्ली टॉपवर 

थोडं पण कामाचं

  • आयपीएल 2021 मध्ये चार सामन्यांनंतर दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले आहेत.  
  • सोमवारी आयपीएलच्या या मोसमातील चौथा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला गेला.
  • रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटलस (डीसी) रनरेट आधारे प्रथम स्थानावर आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या सत्रात सोमवारपर्यंत एकूण चार सामने खेळले गेले.  सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. सोमवारी आयपीएलच्या या मोसमातील चौथा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला गेला. पंजाबने हा सामना चार धावांनी जिंकला. चार सामन्यांनंतर पॉईंट टेबलवर नजर टाकल्यास दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी दोन गुण आहेत, पण रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटलस (डीसी) रनरेट आधारे प्रथम स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) शेवटच्या स्थानी आहे.

चेन्नईचा सर्वात वाईट नेट रनरेट

इयन मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) दुसर्‍या क्रमांकावर आहे. आज, मंगळवारी त्यांचा सामना रोहित शर्माच्या  विद्यमान चॅम्पियन मुंबई इंडियन्स आहे. सामन्यात केकेआर जिंकल्यास ते प्रथम स्थानावर पोहचतील. राजस्थानला पराभूत करणारा कर्णधार केएल राहुलचा पंजाब संघ गुणांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. आज त्याचा सामना कोलकाताशी आहे.  कर्णधार संजू सॅमसनचा राजस्थान संघ सहाव्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) सातव्या आणि चेन्नई आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नईची नेट रनरेट सर्वात वाईट आहे. 

आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांची स्थिती 

  1. मोसमातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळला गेला. बंगळुरू जिंकला. 
  2. दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि दिल्ली कॅपिटलस (डीसी) यांच्यात झाला. हा सामना दिल्लीने जिंकला. 
  3. तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) यांच्यात झाला. कोलकाता जिंकला. 
  4. चौथा सामना पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात झाला. पंजाब जिंकला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी