IPL 2021 : 7 वर्ष कर्णधार असताना आरसीबीला एकदाही विजेतेपद नाही, कॅप्टनशीप सोडताना विराट भावूक

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. यापुढे एक खेळाडू म्हणून मी माझ्यावतीने 120 टक्के देईल, अशी ग्वाहीही दिली.

IPL 2021: RCB doesn't win a single title after 7 years as captain
IPL 2021 : 7 वर्ष कर्णधार असताना आरसीबीला एकदाही विजेतेपद नाही, कॅप्टनशीप सोडताना विराट भावूक   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शेवटच्या आयपीएल सामन्यात विराटचा संघ कोलकात्याकडून पराभूत झाला
  • सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता.
  • यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात

दुबई :  आयपीएल 2021 हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराटने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. यात कोलकात्याकडून पराभूत झाल्याने आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. सामन्यानंतर विराट खूपच भावूक झाला होता.

कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना

विराट कोहली 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जोपर्यंत मी आयपीएलमध्ये खेळेल तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असेन, असं विराटने सांगितले. हा क्षण विराटसाठी खूपच भावूक होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल त्याने आभार व्यक्त केले.

माझ्याकडून १२० टक्के प्रयत्न

विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात तरुण खेळाडू येऊन आक्रमक खेळ दाखवू शकतील. मी भारतीय संघासाठीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एवढेच म्हणेन की मी माझ्याकडून 120 टक्के संघाला दिले आणि यापुढेही खेळाडू म्हणून देत राहीन.

आरसीबीसोबत शेवटच्या दिवसांपर्यंत संबंध

विराट कोहली म्हणाला, ‘आता पुढील तीन वर्षांसाठी नवीन संघ तयार होईल. मी यापुढेही RCB साठीच खेळेल. निष्ठा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या संघाशी माझा संबंध आयपीएलमधील माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकेल. 

कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही ट्रॉफी नाही

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराटने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर 2021 रोजी त्याने बंगळुरुचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट सात वर्षे आरसीबीचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी